पुणे, २९ जुन २०२१: पुणे शहरातील आंबिलओढा झोपडपट्टी भागातील काही घरे महानगरपालिकेमार्फत पाडण्यात आली होती. तेथील झोपडपट्टीवासियांची ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी भेट घेतली.
यावेळी माजी आमदार मोहन जोशी, स्थानिक पदाधिकारी व झोपडपट्टीतील रहिवासी उपस्थित होते.
यावेळी श्री. राऊत यांनी झोपडपट्टीवासियांच्या समस्या जाणून घेतल्या सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे, पावसाळाही सुरु आहे. अशा परिस्थितीत महापालिकेने झोपडपट्टीवासियांची घरे पाडण्याची कारवाई करायला नको होती. आंबिलओढा घटनेची चौकशीची मागणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
More Stories
जलतरंग वादक मिलिंद तुळाणकर यांना राष्ट्रीय पुरस्कार
पुण्यात पोलीस ठाण्यातच महिलेने प्यायले फिनाईल, आयुक्तालयानंतर कोंढव्यात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
पुणे: शहरात वेगवेगळ्या अपघातात तीन ठार, सहकारनगर,वाघोलीत अपघात