पहिल्याच प्रयत्नात पुणे विद्यापीठ अधिसभेत शिवसेनेच्या वाघाची एंट्री..

पुणे, 23/11/2022:  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत शिवसेनेने पहिल्यांदाच निवडणूक लढवत चांगलाच ठसा उमटवत खाते उघडले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार अ‍ॅड. बाकेराव बस्ते या एकमेव उमेदवाराचा खुल्या गटातून विजय झाला. विजयी उमेदवाराचे शिवसेना भवन येथे भव्य सत्कार करण्यात आला.

यावेळी शहर प्रमुख गजानन थरकुडे, विस्तारक राजेश पळसकर, विभागीय सचिव अविनाश बलकवडे, माजी नगरसेवक सचिन भगत, राम थरकुडे, युवराज पारीख, अक्षय माळकर, अक्षय फुलसुंदर, शिवप्रसाद जठार, शुभम दुगाने, हर्षद मंजाळकर, वैभव दिघे, गौरव पापळ, रुपेश थोपटे, गणेश काकडे, प्रथमेश भुकण, मयूर कुटे, संजय वाल्हेकर, सुरेश घाडगे, राहुल शेडगे, किशोर राजपूत, संतोष शेलार, सागर दळवी, नितीन रावलेकर उपस्थित होते.

पुणे विद्यापीठाच्या अधिसभा नोंदणीकृत पदवीधर गटाच्या निवडणुकीच्या १० जागांसाठी रविवारी मतदान झाले. पुणे विद्यापीठाची यंदाची निवडूक चुरशीची झाली. यात भाजप आणि महाविकास आघाडी दोघांनीही आपले थेट पॅनल उभे केले होते. त्यामुळे या निवडणुकीला राजकीय स्वरूप मिळाले होते. युवासेनेच्या पदाधिकार्‍यांची नव्याने नियुक्ती करण्यात आलेली. त्यातच विद्यापिठ अधिसभेच्या निवडणूकांना लागलीच सामोरे जावे लागले. मात्र एवढ्या कठीण काळातदेखील चारपैकी एक उमेदवार जिंकत युवासेनेने आपले स्थान सिद्ध केले आहे. या निवडणूकीच्या निमित्ताने आगामी महागरपालिका निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना एकत्रित महाविकास आघाडीद्वारे निवडणूक लढवून जिंकल्याची ही रंगीत तालीम असल्याचे चित्र आहे.