पुणे व पिंपरी चिंचवड शहरात लॉकडाऊनपुर्वी पीएमपीएमएल बस पास काढलेल्या पासधारकांना मुदतवाढ

पुणे, ११ जून २०२१: लॉकडाऊनपुर्वी बस पास काढलेल्या पासधारकांना पासचा वापर न झाल्याने उर्वरीत दिवसांची मुदतवाढ. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर होणेपुर्वी अनेक नोकरदार, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांसह नियमित प्रवाशांनी पासकेंद्रावरून पी.एम.पी.एम.एल. चे बस पासेस काढलेले आहेत.

तथापि दि. ०३/०४/२०२१ रोजी अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्याने अशा पासधारकांना बस पासचा वापर करता आलेला नाही. प्रवासी नागरिकांचे मागणी व विनंतीस अनुसरून महामंडळाचे बस संचलन दि.०६ जुन २०२१ पासून सुरू होत असलेने पास विभागामार्फत स्वारगेट, हडपसर बसस्थानक, मनपा, डेक्कन, पुणेस्टेशन (मोलेदीना), वाघोली, कात्रज, वारजे माळवाडी, निगडी, चिंचवड गाव, पिंपरी चैक (लोखंडे सभागृह), पिंपळे गुरव, भोसरी (शिवाजी चौक) आळंदी, सासवड, उरूळीकांचन व राजगुरूनगर या पास केंद्रांवर संबंधित पास धारकांचे अर्ज स्वीकारून त्यांना मॅन्युअल पास व मी-कार्ड पासची मुदत वाढवून देण्यात येणार आहे. तरी संबंधित पासधारकांनी अर्ज व मुळ पाससह वर नमुद केलेल्या पास केंद्रांवर दिनांक २० जून २०२१ पर्यंत पुर्तता करून पासवर मुदतवाढ करून घ्यावयाची आहे. तदनंतर कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही याची सर्व संबंधित पासधारकांनी नोंद घ्यावी.