पुणे, 26 डिसेंबर 2022 : सीमकार्ड सुरू करण्याच्या बतावणीने सायबर चोरट्याने सदाशिव पेठेतील एकाला चार लाख ९० हजारांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांच्या विराेधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर २३ डिसेंबर रोजी चोरट्यांनी संपर्क साधला. मोबाइलमधील सीमकार्ड बंद पडण्याची शक्यता आहे. सीमकार्ड सुरू (ॲक्टीव्हेट) करण्यासाठी रिचार्ज करावे लागेल, अशी बतावणी चोरट्याने केली. त्यानंतर चोरट्याने तक्रारदाराला दहा रुपयांचे रिजार्च करावे लागेल, असे सांगितले. तक्रारदाराने दहा रुपये ऑनलाइन पद्धतीने चोरट्याला पाठविले. त्यापाठोपाठ चोरट्याने तक्रारदाराच्या बँक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने चार लाख ९० हजार रुपये लांबविले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड तपास करत आहेत.
More Stories
पुणे विद्यापीठाचे ३० जानेवारीचे पेपर ५ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार
पीएमडीटीए-महाराष्ट्र मंडळ ब्राँझ सिरिज 2023 टेनिस स्पर्धेत नीरज जोर्वेकर, रणवीर गुंड, आयुष कौशल यांचा दुस-या फेरीत प्रवेश
पुणे: दौंडमधील सामूहिक हत्याकांड प्रकरणात आरोपींनी वापरलेली वाहने जप्त, सामुहिक हत्याकांड प्रकरणात आरोपींची चौकशी सुरू