एफसी बेकडिन्हो, न्यू इंडिया सॉकरचा सहज विजय

पुणे, 10/5/2022 – पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या द्वितिय श्रेणी फुटबॉल साखळी स्पर्धेत सोमवारी एफसी बेकडिन्हो आणि न्यू इंडिया सॉकर संघांनी सहज विजयासह आपल्या मोहिमेस सुरवात केली. याच दरम्यान तृतिय श्रेणीत केशव माधव प्रतिष्ठान (केएमपी) इलेव्हन आणि लौकिक एफए यांच्या दरम्यान झालेला सामना रंगतदार लढतीनंतर बरोबरीत सुटला.
स.प. महाविद्यालयाच्या मैदैनावर झालेल्या सामन्यात एफसी बेकडिन्हो संघाने युनायटेड पूना स्पोर्ट अकादमीचा (युपीएसए) ६-१ असा पराभव केला. अ गटात झालेला हा सामना आजचा सर्वाधिक मोठ्या निर्णयाचा ठरला. जेम्स डिसूझाने ७ आणि १०व्या मिनिटाला गोल केले. त्याला सौरभ पाटिल (३४ आणि ५९वे मिनिट) यांनी प्रत्येकी दोन गोल केले. मोहन पाटिलने (३५वे मिनिट), ऋतिक राऊत (६८ मिनिट) यांनी अन्य गोल केले.
त्यानंतर ड गटातील सामन्यात न्यू इंडिया सॉकर संघाने युनिक वानवडीचा ४-० असा पराभव केला. झेफामियॉं याने पाचव्याच मिनिटाला संघाचे खाते उघडले. त्यानंतर अभिषेकने (४० आणि ४८वे मिनिट) दोन, तर केईन इव्हान (५६वे मिनिट) याने एक गोल केला. ट
क गटातील सामन्यात संगम यंग बॉईज ब संघाच्या विजयात साहिल कदमची हॅटट्रिक आकर्षण ठरली. त्याने १९, ५१ आणि ५४व्या मिनिटाला गोल केले. याच हॅटट्रिकच्या जोरावर संगम यंग बॉईज संघाने ३-० असा विजय मिळविला.
तृतिय श्रेणी गटातील एसएसपीएमएस मैदानावर झालेल्या सामन्यात मॅथ्यू एफए संघाने मोमिनपुनपुरा एफसी संघाचा ३-० असा पराभव केला. सॅम्युएल भिसे याने ९व्या, तर अॅस्टन मॅथ्यूने ५२व्या आणि सिद्धार्थ ढवळीकरने ५५व्या मिनिटाला गेल केल.
दिवसातील अखेरच्या सामन्यात केएमपी इलेव्हन संघाने दोन वेळा पिछाडीवर राहिल्यानंतरही लौकिक एफए संघाला २-२ असे बरोबरीत रोखले. लौकिकसाठी यश कोद्रे, वेदांत वाणी यांनी गोल केले. केएमपीसाठी विराज खंडागळे आणि सार्दुल तावेसे यांनी गोल केले.
निकाल – 
 
सप कॉलेज मैदान
द्वितीय श्रेणी: चेतक एफसी ब १ (अर्णा आपटे २९वे मिनिट) अनिर्णित वि. जाएंटस १ (अन्शुल शर्मा १८वे मिनिट)
एफसी बेकडिन्हो ६ (जेम्स डिसुझा ७, १०वे मिनिट, मोहन पाटिल ३५वे मिनिट, सौरभ पाटिल ३४, ५९वे मिनिट, ऋतिक राऊत ६८वे मिनिट) वि.वि. उपसा १ (मुरहरी राठोड १७वे मिनिट)
गट सी – राम स्पोर्टिंग १ (मयुक वांद्रे ११वे मिनिट) वि.वि. गोल्फा बुशरेंजर्स ०
संगम यंग बॉईंज ब ३ (साहिल कदम १९, ५१, ५४वे मिनिट) वि.वि. वानवडी स्पोर्टस ०
पूल डी – न्यू इंडिया सॉकर ४ (झेफामियॉं ५वे मिनिट, अभिषेक श्रीवास्तव ४०, ४८वे मिनिट), केईथ इव्हान्स ५६वे मिनिट) वि.वि. युनिक वानवडी ०
एसएसपीएमस मैदान
 
तृतिय श्रेणी: अ गट – सांगवी एफसी ब ० बरोबरी वि. नव महाराष्ट्र 
हायलॅंडर्स एफसी १ (ओमकार लेने १४वे मिनिट) वि.वि. अखिल भुसारी कॉलनी ०
ब गट – मॅथ्यू एफए ३ (सॅम्युएसल भिसे ९वे मिनिट, अॅस्टर मॅथ्यू ५२वे मिनिट, सिद्धार्थ ढवळीकर ५५वे मिनिट) वि.वि. मोमिनपुरा एफसी ०
साई एफए १ (शुभम रावंडेल ११वे मिनिट) वि.वि. आर्यन्स एससी ब ०
गट सी – लौकिक एफए २ (यश कोद्रे १९वे मिनिट, वेदांत वाणी ४०वे मिनिट) बरोबरी वि. केशव माधव प्रतिष्ठान इलेव्हन २ (विराज खंडागळे २४वे मिनिट, शार्दुल तावेसे ४४वे मिनिट).
गट ई: स्निग्मय एफसी ‘ब’: 4 (विष्णू पिल्लई 14वा, 38वा; यश कोरे 45वा; प्रिन्स जॉन 58वा) वि.वि. जायंट्झ ‘ब’: 1 (जयदीप साळवी 58वा)