सुस खिंडीत भिषण अपघात, शिवशाही बसनो सात गाड्या उडवल्या

पुणे, १६ आॅक्टोबर २०२२: मुंबई -पुणे महामार्गावर सुस पाषाण खिंडी०वळ भरधाव शिवशाही बसचा ब्रेक फेल झाल्याने मोठा अपघात घडला. या अपघातामध्ये सहा ते सात चारचाकी तर दोन ते तीन दुचाकीना धडक दिली आहे. चा घटनेत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

बोरिवली वरून सातार्याच्या दिशेने शिवशाही बस जात होती. सुस खिंडीत बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे बस चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेली, त्यामुळे एकामागून एक गाड्यांना बसने जोराची धडक दिली. त्यामुळे नेमके काय झाले हे वाहनचालकांना काहीच कळाले नाही.

सर्व चारचाकींचा मागचा भाग चेंबला गेला. पाषाण तलावाजवळ हा अपघात घडताच नागरिक मदतीला धावले. विलास मानसिंह जाधव (वय: ५५वर्षे) या बस चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या घटनेमुळे वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली. पण स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली. सुदैवाने यात फार मोठी जीवितहानी झालेली नसून; जखमींना जवळच्या दवखान्यात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पोलिस आणखी तपास करत आहेत.