पुणे, २५ ऑगस्ट २०२२: कंपनीतील विद्युत मीटरचे वीज कनेक्शन बंद करण्यासाठी महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याने ५० हजाराची लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोषकुमार बालासाहेब गित्ते असे गुन्हा दाखल केलेल्या अभियंत्याचे नाव आहे. गित्ते भोसरी उपविभाग एक महावितरण कार्यालयात कनिष्ठ अभियंता आहेत. याबाबत ७९ वर्षीय तक्रारदाराने लाच लुपचत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
तक्रारांच्या कंपनीतील विद्युत मीटरचे वीज कनेक्शन बंद करण्यासाठी त्यांनी महावितरणकडे अर्ज केला होता. अर्जावार कारवाई करण्यासाठी अभियंत्याने तक्रारदाराकडे ५० हजाराची लाच मागितली. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दिली. या तक्रारीची पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानूसार लाच मागणीचा गुन्हा नोंद केला आहे.
More Stories
पुणे विद्यापीठाचे ३० जानेवारीचे पेपर ५ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार
पीएमडीटीए-महाराष्ट्र मंडळ ब्राँझ सिरिज 2023 टेनिस स्पर्धेत नीरज जोर्वेकर, रणवीर गुंड, आयुष कौशल यांचा दुस-या फेरीत प्रवेश
पुणे: दौंडमधील सामूहिक हत्याकांड प्रकरणात आरोपींनी वापरलेली वाहने जप्त, सामुहिक हत्याकांड प्रकरणात आरोपींची चौकशी सुरू