पुणे, २४/०८/२०२१: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात चतु:शुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांचे पथक त्यांना अटक करण्यासाठी चिपळूणला रवाना झाले आहे. त्यामध्ये दोन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. याप्रकरणी शिवसेनेचे पुणे युवा सरचिटणीस रोहित रमेश कदम रा. पाषाण यांनी तक्रार दिली आहे.
केंद्रीय मंत्री राणे काल पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती. याप्रकरणी शिवसेना युवासेनेचे सरचिटणीस रोहित कदम यांनी त्यासंदर्भात चतुशुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार घटनेचे गांभीर्य ओळखून काल रात्री वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. त्यानुसार आज सकाळी पुणे पोलिसांचे पथक केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी चिपळूण ला गेले आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
More Stories
ठाण्याला हरवून पुणे उपांत्य फेरीत
अस्मयच्या हॅटट्रिकने लौकिक एफएचा विजय पीडीएफए फुटबॉल
एमएसएलटीए- पीएमडीटीए एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज 18 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत सार्थ बनसोडेचा मानांकित खेळाडूवर विजय