पुणे, २४/८/२०२१ – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अनुद्गार काढल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांचे पथक चौकशीसाठी चिपळूणला रवाना झाले आहे. चिपळूण न्यायालयाकडून राणे यांच्या विरोधात अटक वॉरंट बजाविण्यासाठी पोलिसांकडून कार्यवाही करण्यात येणार आहे. कोथरूड विभाग युवा सेनेचे चिटणीस रोहित रमेश कदम (वय २९, रा. सुतारवाडी, पाषाण) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
केंद्रीय मंत्री राणे यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविषयी अनुद्गार काढले. राणे यांचे वक्तव्य भावना दुखावणारे आहे. अशा वक्तव्यामुळे समाजात द्वेष निर्माण होतो. त्यांच्या वक्तव्यामुळे सामाजिक शांतता तसेच कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आली आहे. त्यामुळे राणे यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई करण्यात यावी, असे कदम यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाNयांनी घटनास्थळी धाव घेउन कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी दोन पोलीस निरीक्षक आणि चार कर्मचारी चौकशीकामी चिपळूनला रवाना झाले आहेत.
मुख्यमंत्र्याबद्दल अनुद्गार काढल्याप्रकरणी संबंधित केंद्रीय नेत्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार पुढील तपास सुरू आहे. – अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर
More Stories
अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या सुधारित खर्चास मान्यता
औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नाव बदलण्यास राज्य सरकारची मान्यता
पीएमपीएमएलतर्फे ‘मी पीएमपीएमएलचा प्रवासी’ स्पर्धेचे आयोजन