September 24, 2025

धायरी फाटा येथे इमारतीत पहिल्या मजल्यावर आगीची घटना; जखमी नाही

पुणे – आज दिनांक ०७•०२•२०२३ रोजी सकाळी ०९•२७ वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात धायरी फाटा, ओम पॅलेस या इमारतीत आग लागल्याची वर्दि मिळताच अग्निशमन दलाकडून नवले अग्निशमन केंद्र येथून तातडीने अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, ओम पॅलेस या तीन मजली असणारया इमारतीत पहिल्या मजल्यावर आग लागली आहे. त्याचवेळी सदर ठिकाणी उपस्थित यांच्याकडून चावी घेऊन दार उघडत आत प्रवेश केला. मोठ्या प्रमाणात धुर असल्याने आतमध्ये कोणी अडकले नसल्याची खाञी करत पाण्याचा मारा सुरू केला व सुमारे दहा मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवत धोका दुर केला आणि आग इतरञ कोठे ही पसरणार नाही याची खबरदारी घेतली. घटनास्थळी कोणी ही जखमी नाही. सदर ठिकाणी सृष्टी डिझायनर यांचे कार्यालय असून आगीमध्ये संगणक, प्रिंटर, लाकडी सामान, विद्युत उपकरणे व इतर साहित्य पुर्ण जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे. आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटने लागल्याची शक्यता आहे.

या कामगिरीत वाहनचालक नरेश पांगारे व तांडेल निलेश पोकळे तसेच फायरमन अजित शिंदे, विक्रम मच्छिंद्र, दिग्विजय नलावडे यांनी सहभाग घेतला.