अग्निशमन दलाचे नियंञण कक्ष विमा कंपनीच्या रेकॉर्डिंगने व्यस्त…

पुणे, 06 ऑक्टोबर 2022: अग्निशमन दलाचे नियंत्रण कक्ष हे आग वा आपत्कालिन परिस्थितीत नागरिकांना वेळेत सेवा देण्याचे कार्य पार पाडत असते. दलाच्या नियंत्रण कक्षात दिवसभरात शेकडो विविध प्रकारचे दुरध्वनी येत असतात व त्याप्रमाणे नियंत्रण कक्षातील जवान परिस्थिती हाताळत योग्य ती सेवा बजावत असतात.

परंतु सध्या पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षातील दुरध्वनी क्रमांक १०१ वर गेले दोन दिवस (दिनांक ०४|१०|२०२२ पासून) विमा कंपनीचे ध्वनीमुद्रित रेकॉर्डिंग सातत्याने वाजत आहे. नियंत्रण कक्षामधे असणारे चार इनकमिंग लाइन्स यावर विनाविलंब विमा कंपनीचे रेकॉर्डिंग फोन उचलताच ऐकू येते. यामुळे दलाच्या कामकाजात अडथळा निर्माण होत असून नागरिकांनी संपर्क साधल्यास नियंत्रण कक्षाचे दुरध्वनी व्यस्त असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे आग वा आपत्कालिन प्रसंगी मोठी अडचण निर्माण होऊ शकते. यामधे विमा कंपनीचे नाव समजत नसून “८०३७६८१००३\८०७१६३१०९९” या क्रमांकावरून सातत्याने संपर्क होऊन विनाकारण ञास होत आहे.

संबंधित विषयावर बीएसएनएलच्या कार्यालयशी संपर्क साधून सदर बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली असून त्यांचे अधिकारी व कर्मचारी याबाबत पुढील कार्यवाही करत आहेत.

आग वा आपत्कालिन अतिप्रसंगी अग्निशमन दलाचे नियंञण कक्ष दुरध्वनी क्रमांक १०१ वर संपर्क न झाल्यास इतर विकल्प क्रमांक खालीलप्रमाणे …

नियंत्रण कक्ष 020-26451707

नियंञण कक्ष अग्निशमन अधिकारी

पंकज जगताप 9823101453

प्रदीप खेडेकर 9890015101

वरिष्ठ अग्निशमन अधिकारी

रमेश गांगड 9689930070

गजानन पाथ्रुडकर 9689930090