मुठा नदीत वाहून जाणाऱ्या कुटुंबाला अग्निशामक दलाच्या जवानांनी वाचवले

पुणे, १२ आॅगस्ट २०२२: खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने मोठा नदीला आलेल्या पुरात कारसह वाहून जाणाऱ्या कुटुंबास अग्निशामकदालाच्या जवानांनी एकदम सिताफिने बाहेर काढण्याची घटना सोमवारी मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास घडली. पाच जणांचे जीवा असतानाच यामध्ये एका आठ वर्षाच्या मुलाचा हे समावेश आहे.

 

मुसळधार पावसामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणारी पानशेत, वरसगाव, खडकवासला, टेमघर ही चारी धरणे भरले आहेत. धरणांमधून नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. असे असतानाही नदी पात्रात अनेक गाड्या अडकल्या. भिडे पूल पाण्याखाली गेल्याने नदीकाठचे रस्ते बंद झाले. पण पनवेल वरून आलेल्या कुटुंबाला याची माहिती नसल्याने त्याचा फटका बसला.

 

मध्यरात्रीच्या पावणे दोनच्या सुमारास एस एम जोशी पुला खालील नदी पात्राच्या रस्त्यावर एक कार पाण्यात वाहून जात असल्याची वर्दी मिळाली, एरंडवणा केऺद्राला मिळाली. तेथे पोहचताच दलाच्या जवानांनी रोप, लाईफ जॅकेट च्या साह्याने नदी पात्रात उतरून टाटा टिगोरोट गाडीतून भेदरलेल्या अवस्थेत अडकलेल्या पाच व्यक्तीऺना सुखरूप बाहेर काढले. अधिक माहिती घेतली असता ही गाडी आणि गाडीतील व्यक्ती मूळच्या पालघर येथील असून पुण्यात नातेवाईकांकडे आले होते. रजपूत विटभट्टी कडून कारमध्ये पात्रातील रस्त्याने जात असताना पाण्याचा विसर्ग खूप मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याऺची गाडी वाहून जात गरवारे पूलाखाली अडकली होती. दलाच्या जवानांनी त्वरित समयसूचकता दाखवत गाडी जवळ पोहचत या सर्वांना बाहेर काढले.

वऺचिका लाल वाणी (वय १३),

प्रिया लाल वाणी (वय २२), कुणाल लाल वाणी (वय २८)

४.कपिल लाल वाणी (वय २१)

५. कृष्णा लाल वाणी (वय ८)

यांची सुखरूप सुटका केली. या कामगिरी मध्ये एरऺडवणा , जनता वसाहत च्या फायर गाड्या आणि सेऺट्रल फायर स्टेशनची रेस्क्यू व्हॅनची मदत झाली.ड्रायव्हर ज्ञानेश्वर खेडेकर, फायरमन किशोर बने, दिलीप घडशी, मदतनीस सऺदीप कार्ले याऺचे विशेष अभिनऺदन, खूप छान कामगिरी पार पाडली.