सराईत वाहनचोराकडून पाच दुचाकी जप्त, खडक पोलिसांची कामगिरी

पुणे, दि. ४ जून २०२१: शहरातील मध्यभागातून दुचाकी चोरणाNया सराईताला खडक पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १ लाख ७५ हजार रूपये विंâमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अभिषेक शरद पवार (वय ३३, रा.गुरूवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. यापूर्वी त्याच्याविरोधात विश्रामबाग, खडक, दत्तवाडी, लष्कर, वाकड पोलीस ठाण्यात १२ गुन्हे दाखल आहेत.

खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुभाषनगर परिसरातून दुचाकी चोरून नेण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. त्यावेळी सराईत वाहनचोरी घोरपडे पेठेतील एका गॅरेजजवळ थांबल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी समीर माळवदक आणि फहिम सय्यद यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून १ लाख ७५ हजार रूपये विंâमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गाडे , पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम मिसाळ, फहिम सय्यद, संदीप पाटील, समीर माळवदकर, बंटी कांबळे, राहुल मोरे, सागर केकाण, रवी लोखंडे, हिम्मत होळकर, अजिज बेग, अमेय रसाळ, अनिकेत बाबर यांच्या पथकाने केली.