पुणे: नात्यातील ५ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

पुणे, ०१/०८/२०२२:

कुंजीरवाडीत नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली असून, नात्यातील ५ वर्षीय चिमुरडीवर तरुणाने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलीसांनी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.

 

याप्रकरणी पिडीत मुलीच्या ३५ वर्षीय आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, २५ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. हा प्रकार गेल्या महिन्यात घडला आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नराधम तरुण तक्रारदारांच्या मावस बहिणीचा मुलगा आहे. दरम्यान, त्यांनी त्यांच्या पाच वर्षाच्या मुलीला येथील मावशीकडे सोडले होते. तर, आरोपी तरुण त्यांच्या घरी येत जात होता. यावेळी त्याने चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केले. तसेच, कुणाला काही सांगितल्यास तुझ्या आईला कापून टाकील, अशी धमकीही दिली होती. चिमुरडीच्या पोटात त्रास होऊ लागल्याने तिने आईला घडलेला हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. अधिक तपास पोलीस करत आहेत.