राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात ध्वजारोहण संपन्न

पुणे, १६ आॅगस्ट २०२२: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण पार पडले. शरदचंद्र पवार साहेब यांचे वर्गमित्र व विठ्ठलशेठ मणियार यांच्या हस्ते संपन्न झाला.

 

विठ्ठलशेठ मणियार म्हणाले, सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत देश विविध धर्म,भाषा , प्रांत अशी वैविध्यपूर्ण संस्कृती असणारा देश आहे.

अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती देत आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे,त्यांच्या बलिदानाची आठवण करत त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण राष्ट्रीय उत्सव साजरे करत असतो.

भारत देश भौगौलिक, सामाजिक, सांस्कृतिक विविधतेनं नटलेला, विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती, लोककला, लोकसंस्कृती व इतिहासाचा गौरवशाली वारसा लाभलेला समृद्ध देश आहे. देशाची विविधता हीच देशाची खरी शक्ती आहे. सशक्त, समर्थ, समृद्ध, बलशाली भारत आपल्याला घडवायचा आहे. कोट्यवधी स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित ठेवणं, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम राखणं, भारतीय राज्यघटना, लोकशाही व्यवस्था व मूल्यांचं जतन करणं, त्यांना बळकट करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्यं आहे. हे कर्तव्य पार पाडत असतानाच देशाची प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी विचारधारा पुढे नेणं, सर्वधर्मसमभावाचा आदर करीत समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर अथक, निरंतर चालत राहण्याचा निर्धार करुया.

उत्साह, आनंद आणि देशभक्तीने भारावलेल्या आजच्या या पवित्र दिवशी आपल्या विचारांच्या कक्षा विस्तृत करून लोकशाही अधिकाधिक समृध्द करण्याचा निश्चय करूयात.

 

 

ध्वजारोहण सोहळ्यासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ॲड. जयदेव गायकवाड, अंकुश काकडे, प्रदीप देशमुख , रवींद्र माळवदकर,महेंद्र पठारे,,श्रीकांत शिरोळे,भगवानराव साळुंके,महेश शिंदे,किशोर कांबळे,मृणालिनी वाणी,सुषमा सातपुते,प्रकाश म्हस्के,समीर शेख,संदीप बालवडकर,महेश हांडे,दिपक कामठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.