पुणेकरांनी प्रथमच अनुभविली हरिहरन आणि उस्ताद राशिद खान यांची जुगलबंदी

पुणे, ८ जानेवारी २०२२ : सुप्रसिद्ध गझल गायक हरिहरन आणि ज्येष्ठ गायक उस्ताद राशिद खान यांच्या  जुगलबंदीने १४ व्या स्वर झंकार महोत्सवाचा समारोप झाला.  पुणेकर रसिकांना प्रथमच जी जुगलबंदी अनुभवायला मिळाली.
त्यांनी मिश्र खमाज रागाने सादरीकरणाची सुरूवात केली. त्यामध्ये ‘बाली उमर लढखैया अब न छेडो न सैया…’ ही केहेरवा तालातील रचना, अध्दा तीनतालामध्ये उस्ताद गुलाम खाँ यांची रचना ‘ सुंदर बलमा मन भावे… ‘ ही बंदिश त्यांनी सादर केली. खास रसिकांच्या आग्रहास्तव ‘याद पिया की आये…’ ही ठुमरी आणि आओगे जब तुम साजना…, हे लोकप्रिय गीत त्यांनी सादर केले.   शास्त्रीय संगीत व उपशास्त्रीय संगीत प्रकारातील ‘तू ही रे…’ या गीताच्या एकत्रित सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उस्फूर्त प्रतिसाद दिला.  त्यांना अजय जोगळेकर( संवादिनी), संजय दास ( गिटार), मुराद अली खान (सारंगी), ओजस अधिया (तबला), अतुल राणींगा (कीबोर्ड), कृष्णा बोंगाणे, अरमान खान, नागेश आडगावकर (तानपुरा आणि स्वर साथ) केली.