पुणे, ६ ऑगस्ट २०२५: पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची बैठक सुरू असताना मनसेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह बैठकीच्या दालनामध्ये गेल्यामुळे आयुक्त आणि किशोर शिंदे यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली. किशोर शिंदे आयुक्तांच्या अंगावर धावून गेल्यामुळे एकदम खळबळ उडाली. मात्र आता या वादाला मराठी विरुद्ध अमराठी असा रंग मिळाल्यामुळे राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.
आयुक्त नवल किशोर राम स्वच्छता अभियाना संदर्भात बैठक घेत होते त्यावेळी किशोर शिंदे व त्याचे कार्यकर्ते हे ऐकताना भेटण्यासाठी आयुक्त कार्यात गेले आयुक्तांची बैठक सुरू असल्याने त्यांनी काही वेळ वाट पाहिली. पण बैठक संपत नसल्याने ते थेट बैठकीच्या दालनामध्ये घुसले. आयुक्तांनी त्यावेळी तुमचे काम काय आहे ?असे विचारले असता, मी माजी नगरसेवक आहे असे शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर आयुक्तांनी पुन्हा एकदा तुमचे काम काय आहे हे विचारले त्यावरून शिंदेंचा पारा आणखीन चढला व ते थेट आयुक्तांच्या खुर्चीकडे धावून गेले. त्यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांना रोखले ‘आप बाहेर निकल जाओ’ असे हिंदीतून आयुक्त बोलल्यानंतर शिंदे यांनी ‘तुम्ही मराठीतून बोला’ असा आक्षेप घेऊन ‘तुम्ही महाराष्ट्रात आलेला आहात, बाहेर पाठवीन, असे आयुक्तांना धमकावले. त्यावर आयुक्तांनी ‘मी घरात घुसून मारेन’ असे त्यांना बजावल्यानंतर या वादात आणखीन भर पडली.
आयुक्त व किशोर शिंदे या दोघांचाही पारा वाढल्याने या दोघांनाही सावरण्यासाठी गडबड सुरू झाली. महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनी किशोर शिंदे व त्यांच्या कार्यकर्त्यांना कार्यातून बाहेर काढले. संतप्त झालेल्या आयुक्तांनी बैठक संपत स्वतःच्या दालनात गेले.
मनसेचे सरचिटणीस किशोर शिंदे म्हणाले, आम्ही आत मध्ये गेल्यानंतर आयुक्ताने तू कोण आहेस ? आधी बाहेर हो ? असे सांगितले. मी नगरसेवक असल्याचे सांगितले पण ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. ते शेवटपर्यंत माझ्यासोबत उद्धटपणे बोलत होते. त्यावरून आमच्यात वाद झाला.
नवल किशोर राम म्हणाले, त्यांनी मला घरात घुसून मारेन अशी धमकी दिलेली आहे. महापालिकेतील सीसीटीव्ही तपासावेत. मराठी संस्कृती बदनाम करू नका
महाराष्ट्रात मी अनेक वर्ष काम केले आहे. बीडचा चार वर्ष जिल्हाधिकारी होतो. पण अशा पद्धतीने बैठक सुरू असताना आत मध्ये कोणीतरी घुसतो आणि दादागिरी करतो हे मी यापूर्वी महाराष्ट्रात कधीही पाहिलेले नाही. त्यांची वागण्याची एकंदरीत पद्धत बघता नागरिकांचे प्रश्न सोडवायचे नाही तर कोणी तर आज कोणाच्या तरी सांगण्यावरून ते इथे गोंधळ घालण्यासाठी आलेले होते असे वाटते. ते मनसेचे कार्यकर्ते आहेत पण ते मराठी संस्कृती बदनाम करत आहेत. ते गुंडा प्रमाणे वागत आहेत. त्यामुळे अशा लोकांशी मला बोलायचे नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश मी दिलेले आहेत. तसेच पोलीस आयुक्त सोबत माझी चर्चा झालेली आहे. ४० अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू असताना बैठकीत घुसून दादागिरी करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांना उद्धटपणे बोलणे ही पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात घडते जाते याचे मला वाईट वाटले, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
More Stories
पुण्यात प्राण्यांवरील अत्याचाराविरोधात जोरदार मोर्चा
“जैन धर्माच्या पवित्र जागेचा सौदा – ट्रस्टकडून बिल्डरच्या घशात जमीन घालण्याचा डाव!”
Pune: उंड्रीमध्ये एका सदनिकेत आगीची घटना; एक मृत तर पाच जखमी