साताऱ्यात गर्भवती महिला वनरक्षकला मारहाण करणाऱ्या माजी सरपंचाला अटक

सातारा, 20 जानेवारी,२०२२: सातारा जिल्ह्यातील पळसवाडी गाव येथे ‘ऑन ड्युटी’ असलेल्या गर्भवती महिला वनसंरक्षकास मारहाण करणाऱ्या माजी सरपंचाला सातारा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीवर कलम 354 व 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पळसवाडी गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी ३ महिन्यांच्या गर्भवती महिला वनरक्षकला निर्दयपणे लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

या प्रकरणाची तात्काळ दखल घेत,

महिला आयोगाने आरोपीवर कडक कारवाई करण्याची सूचना सातारा पोलीस अधीक्षक यांना दिली होती. त्यानुसार, कार्यवाही करत सातारा पोलिसांनी गुरुवारी (२० जानेवारी) पहाटे आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीवर कलम 354 व 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयोगाच्या अध्यक्षा रूपाली जानकर यांनी या घटनेबाबत तीव्र निषेध नोंदवत,

अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी राज्य महिला आयोग निश्चितपणे कारवाई करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.