खडकी येथे रेमडेसिव्हर इंजेक्शनची बेकायदेशीरपणे ज्यादा दराने विक्री करणाऱ्या चौघांना अटक, महिलेचाही समावेश

पुणे,  24 एप्रिल 2021: शहरातील खडकी येथे रेमडेसिव्हर इंजेक्शनची बेकायदेशीरपणे ज्यादा दराने विक्री करणाऱ्या चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
खडकी गुरुव्दारा समोरील परिसरात काही जण रेमडीसिव्हीर हे इंजेक्शन काळ्या बाजाराने ३७,००० / रुपयाला एक इंजेक्शन याप्रमाणे विकण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शाखेच्या युनिट -२ ला ही माहिती दिली. त्यानुषंगाने युनिट -२ चे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश मोरे , पोलिस उपनिरीकक्ष आनंदराव पिंगळे व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करुन , कारवाईचे नियोजन केले आणि एका बनावट ग्राहकाच्या मदतीने हा प्रकार उघडकीस आणला. या प्रकारणी पोलिसांनी निकीता गोपाळ ताले , वय -२५ वर्षे,( रा . महात्मा फुले नगर , एम.आय.डी.सी. भोसरी) या महिलेस ताब्यात घेतले. तसेच या रॅकेटमध्ये राहुल बाळासाहेब वाळुज, वय २७ वर्षे (रा . अमित अपार्टमेंट , चाफेकर चौक , चिंचवड ) , रोहन बाळासाहेब वाळूज , वय -२० वर्षे ( रा .चिंचवड) आणि  प्रतीक गजानन भोर, वय २६ वर्षे (रा . अनुसया पार्क लेन नं . ५ श्री हॉस्पिटल समोर)  यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. प्रतिक याला औषधांबाबत व वितरकांबाबत असलेल्या माहितीचा गैरवापर करुन स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी त्यानी हा गुन्हा केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षक जयश्री सवदती यांनी दिलेल्या तक्रारी वरुन खडकी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गुन्हे शाखेच्या युनिट -२चे सहायक पोलिस निरिक्षक प्रकाश मोरे  पुणे शहर हे करीत आहेत . या पुर्वीही औषध निरीक्षक , अन्न व औषध प्रशासन पुणे , यांच्या मदतीने गुन्हे शाखा पुणे शहर च्या वेगवेगळ्या पथकांनी पुणे शहर परिसरात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार करणा – या व्यक्तींविरुध्द वेगवेगळया पोलीस स्टेशनला ५ गुन्हे दाखल करुन ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे .
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे आदेशाने अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे , गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे , सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट -२ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही  कारवाई केली आहे.
रेमडेसिव्हीर इंजेक्शन च्या होणा – या काळा बाजार रोखण्यासाठी पोलीस आयुक्त गुप्ता यांनी  यानी विशेष मोहीम हाती घेतली असुन सर्व पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेची पथके कार्यान्चीत केलेली आहेत . नागरिकांनी  रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे माहीती असल्यास त्वरीत पुणे शहर पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन  पोलीस प्रशासनाने केले आहे.