September 24, 2025

एमएसएलटीए इंटेंसिटी टेनिस अकादमी अखिल भारतीय मानांकन(12वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत चार मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का

पुणे, 6 फेब्रुवारी 2024: इंटेंसिटी  टेनिस अकादमी व शेपिंग चॅम्पियन्स फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एमएसएलटीए इंटेंसिटी टेनिस अकादमी अखिल भारतीय मानांकन(12वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात रिशीता यादव, चाहत ठाकूर, मनस्वी राठोड यांनी तर, मुलांच्या गटात लव परदेशी या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आगेकुच केली. 
 
खराडी कपिला रिसॉर्ट येथील इंटेंसिटी  टेनिस अकादमी टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात चाहत ठाकूर हिने तिसऱ्या मांकित ख्याती मनीषचा 6-4, 6-1 असा तर, रिशीता यादवने सहाव्या मानांकित अनिका श्रीवास्तवचा 6-2, 6-3  असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. संघर्षपूर्ण लढतीत मनस्वी राठोड हिने सातव्या मानांकित अस्मी पित्रेचा 4-6, 6-4, 6-1 असा तीन सेटमध्ये पराभव केला. 
 
मुलांच्या गटात मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत क्वालिफायर लव परदेशी याने पाचव्या मानांकित कबीर गुंडेचाचा 6-3, 6-4 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. अव्वल मानांकित आरव बेले याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत रेयांश गुंडचे आव्हान 6-0, 6-0 असे सहज मोडीत काढले. शौर्य गडदे याने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या अवधूत निलाखेचा 6-0, 6-0 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. 
 
निकाल: दुसरी फेरी: मुले:
आरव बेले(1)वि.वि.रेयांश गुंड 6-0, 6-0;
आदिनाथ कचरे वि.वि.पियुश रेड्डी 7-5, 6-2;
शौर्य गडदे वि.वि.अवधूत निलाखे 6-0, 6-0;
लक्ष्य त्रिपाठी(7) वि.वि.अभिनव शर्मा 6-2, 7-5;
अद्वैत गुंड(6)वि.वि.वेद परदेशी 6-3, 6-2;
यशवंतराजे पवार(3)वि.वि.अर्णव पांडे 6-4, 4-6, 6-3;
लव परदेशी  वि.वि. कबीर गुंडेचा(5) 6-3, 6-4;
तक्षिल नगर(2)  वि.वि.अखिलेश चव्हाण 6-2, 6-3;

मुली:
वैदेही शुक्ला(1)वि.वि.कनिष्का नारुका 6-1, 6-0;

रिशीता यादव वि.वि.अनिका श्रीवास्तव(6)6-2, 6-3; 
चाहत ठाकूर वि.वि.ख्याती मनीष(3)6-4, 6-1; 
मनस्वी राठोड वि.वि.अस्मी पित्रे(7) 4-6, 6-4, 6-1;