पुणे, दि. ६ डिसेंबर, २०२३ : १९८५ नंतर अनेक प्रकारे श्रीराम जन्मभूमीच्या कार्यात वेळो वेळी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. याच शृंखलेतील नवा अध्याय म्हणून अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी वस्त्र विणण्याचा ‘दो धागे श्रीराम के लिए’ हा उपक्रम येत्या १० ते २२ डिसेंबर दरम्यान पुण्यात संपन्न होणार आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र, अयोध्या आणि पुण्यातील हेरीटेज हँडविविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमाचा शुभारंभ रविवार दि १० डिसेंबर रोजी सायं ६.३० वाजता शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज मैदानावर आयोजित कार्यक्रमात होणार असल्याची माहिती हेरीटेज हँडविविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालिका अनघा घैसास यांनी कळविली आहे.
उद्घाटनानंतर १० ते २२ डिसेंबर दरम्यान पुण्यातील फर्गसन रस्त्यावरील सौदामिनी हँडलूम या ठिकाणी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत नागरिकांना येऊन श्रद्धेचे व विश्वासाचे दोन धागे आपल्या रामलल्लासाठी विणता येणार असल्याचेही अनघा घैसास म्हणाल्या. सदर उपक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून त्यासाठी कोणत्याही प्रकारची नोंदणी करणे आवश्यक नाही, याची कृपया नोंद घ्यावी. आयोजकांच्या वतीने याआधी उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र आता कोणत्याही प्रकारच्या नोंदणीची आवश्यकता नाही, असे कळविण्यात आले आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन रविवार, दि. १० डिसेंबर रोजी सायं ६.३० वाजता शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज मैदानावर संपन्न होईल. यावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या हस्ते उपक्रमाला सुरुवात होईल. तसेच श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे मुख्य मार्गदर्शक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी, कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज, राज्याच्या पर्यटन आणि कौशल्य, विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे आदी मान्यवर उपस्थित असतील. यावेळी प्रमुख पाहुणे उपस्थितांना मार्गदर्शन करतील. याच कार्यक्रमात राममंदिराच्या आंदोलनात सहभागी आणि सबंधित लोकांचे अनुभव कथन असलेल्या ‘राममंदिराचे रामायण’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होईल.
More Stories
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: वसतिगृह स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन