मुंबई आणि गोरखपूर/ दानापूर/दरभंगा/छपरा/ मंडुवाडीह दरम्यान पूर्णतः आरक्षित विशेष गाड्या

मुंबई, 8 मे 2021: प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने मुंबई आणि गोरखपूर/ दानापूर/ दरभंगा/ छपरा/ मंडुआडीह दरम्यान विशेष शुल्कासह पूर्णतः आरक्षित विशेष गाड्या / अतिजलद विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खाली दिलेल्यानुसार:

१. मुंबई – गोरखपूर – मुंबई विशेष (१० फे-या)

01359 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दि. १२.५.२०२१, १४.५.२०२१, १६.५.२०२१, १७.५.२०२१, १९.५.२०२१ (५ फे-या) रोजी २३.३० ​​वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे तिसर्‍या दिवशी ०९.०० वाजता पोहोचेल.
01360 विशेष गोरखपूर येथून दि. १४.५.२०२१, १६.५.२०२१, १८.५.२०२१, १९.५.२०२१ व २१.५.२०२१ (५ फे-या) रोजी १९.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसर्‍या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल.

थांबे : दादर, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, बीना, झांसी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती

संरचनाः १ द्वितीय वातानुकूलित, ६ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान आणि ७ द्वितीय आसन श्रेणी.

२. मुंबई – दानापूर – दानापूर विशेष अतिजलद (४ फे-या)

01361 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून गुरुवार दि. १३.५.२०११ व २०.५.२०२१ (२ फे-या) रोजी दुपारी १२.३० वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसर्‍या दिवशी १८.४५ वाजता पोहोचेल.
01362 विशेष शुक्रवार दि. १४.५.२०२१ व २१.५.२०२१ (२ ट्रिप) रोजी दानापूर येथून २३.३० वाजता सुटेल व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसर्‍या दिवशी ०४.१० वाजता पोहोचेल.

थांबे : दादर, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाळ उपाध्याय जं., बक्सर, आरा.

संरचनाः १ द्वितीय वातानुकूलित, ६ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान आणि ७ द्वितीय आसन श्रेणी.

३. मुंबई – दरभंगा – मुंबई विशेष (४ फे-या)

01363 विशेष मंगळवार दि. ११.५.२०२१ व १८.५.२०२१ (२ फे-या) रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून १२.३० वाजता सुटेल आणि दरभंगा येथे दुसर्‍या दिवशी २३.०० वाजता पोहोचेल.
01364 विशेष गुरुवार दि. १३.५.२०२१ व २०.५.२०२१ (२ फे-या) रोजी १६.४५ वाजता दरभंगा येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसर्‍या दिवशी ०४.१० वाजता पोहोचेल.

थांबे : दादर, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय जं., बक्सर, आरा, पाटलीपुत्र, हाजीपूर, मुझफ्फरपूर, समस्तीपूर.
.
संरचनाः १ द्वितीय वातानुकूलित, ६ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान आणि ७ द्वितीय आसन श्रेणी.

४. मुंबई – छपरा – मुंबई विशेष (२ फे-या)

01365 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दि. १५.५.२०२१ (१ फेरी) रोजी १२.३० वाजता सुटेल व छपरा येथे तिसर्‍या दिवशी ००.३० वाजता पोहोचेल.

01366 विशेष छपरा येथून (१ ट्रिप) दि. १७.५.२०२१ वाजता १९.४० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसर्‍या दिवशी ०४.१० वाजता पोहोचेल.

थांबे : दादर, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, वाराणसी, जौनपूर, औनिहार, बलिया.

संरचनाः १ द्वितीय वातानुकूलित, ६ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान आणि ७ द्वितीय आसन श्रेणी.

५. दादर – मंडुवाडीह – दादर विशेष अतिजलद (६ फे-या)
01357 विशेष दि. १३.५.२०२१, १६.५.२०२१ व २०.५.२०२१ (३ फे-या) रोजी दादर येथून २१.४५ वाजता सुटेल आणि मंडुवाडीह येथे दुसर्‍या दिवशी २२.४५ वाजता पोहोचेल.
01358 विशेष दि. १५.५.२०२१, १८.५.२०२१ व २२.५.२०२१ (३ फे-या) रोजी मंडुवाडीह येथून ००.३५ वाजता सुटेल आणि आणि दुसर्‍या दिवशी ०३.५५ वाजता दादरला पोहोचेल.

थांबे : कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, प्रयागराज छिवकी, वाराणसी.

संरचनाः १ द्वितीयसह तृतीय वातानुकूलित, १ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान आणि ८ द्वितीय आसन श्रेणी.

आरक्षण : पूर्णतः आरक्षित विशेष ट्रेन / अतिजलद विशेष ट्रेनचे 01363 चे विशेष शुल्कासह बुकिंग दि. ९.५.२०२१ रोजी आणि 01359, 01361 व 01357 चे विशेष शुल्कासह बुकिंग दि. १०.५.२०२१ रोजी आणि 01365 चे बुकिंग दि. ११.५.२०२१ रोजी विशेष शुल्कासह सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

विशेष ट्रेनच्या तपशीलवार वेळ आणि थांब्यांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.

केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.

प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.