राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेल तर्फे पुरगस्तासाठी मदत निधी

पुणे, दि.२१ ऑगस्ट २०२१: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेल, पुणे शहरतर्फे सामाजिक बांधिलकी जोपासत पुरग्रस्त व दरड ग्रस्तांसाठी एक लाख अकरा हजार एकशे एक अकरा रुपयांचा धनादेश देण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हा राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट’च्या नावे हा धनादेश देण्यात आला असल्याची माहिती सेलचे अध्यक्ष अॅड लक्ष्मण राणे यांनी दिली.


विभागीय आयुक्त कार्यालय येथे २० ऑगस्ट रोजी हा धनादेश देण्यात आला आहे. यावेळी लिगल सेल माजी प्रदेश अध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस ऍड भगवानराव, लिगल सेल प्रदेश उपाध्यक्ष ऍड सुहास पडवळ, प्रदेश सरचिटणीस ऍड पंडितराव कापरे, ऍड अशोक संकपाळ, ऍड प्रविण नलवडे, चिटणीस ऍड समीर शेख, ऍड विवेक भरगुडे, लिंगल सेल पुणे शहर उपाध्यक्ष ऍड धनाम खलाटे, ऍड प्रकाश पवार, ऍड सुरेश को ऍड भाग्यश्री पाटील, लिगल सेल पुणे शहर सरचिटणीस ऍड उमेश कदम, ऍड अमित शेवाळे, सचिव ऍड ज्ञानेश्वर बडे, मृगेंद खोब्रागडे, ऍड रमेश भंडलकर उपस्थित होते.