‌राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या सुरक्षिततेसाठी निधी मंजूर

पुणे, 10/11/2021: कात्रज येथी राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या सुरक्षिततेसाठी आरसीसीमध्ये सिमाभिंत बांधणे आणि सुरक्षिततेच्या विविध उपाययोजना करण्यासाठी एक कोटी ५३ लाख रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

 

रासने म्हणाले, राजीव गांधी प्राणी संग्रहालयाला अधिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्ष काम करण्यासाठी ९३ लाख २८ हजार रुपये खर्च येणार आहे. ११ लाख १९ हजार रुपये जीएसटी आणि टेस्टिंगसाठी ८५ हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

राजीव गांधी प्राणी संग्रहालयात तरस खंदक

राजीव गांधी प्राणी संग्रहालयात तरस खंदक उभारण्यासाठी १ कोटी ९६ लाख रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय प्राणीसंग्रहालयाच्या निकषानुसार हा खंदक उभारण्यात येणार आहे.