पुणे,दि.8 डिसेंबर 2023: डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार 18 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात लक्ष्मीसिरी दांडू हिने दुहेरी गटातील विजेतेपदाबरोबरच एकेरीत अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट,येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या उपांत्य फेरीत मुलांच्या गटात पहिल्या सामन्यात भारताच्या अर्णव पापरकर याने दुसऱ्या मानांकित क्रिश त्यागीचा 3-6, 6-3, 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरी गाठली. हा सामना 2तास 20मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये क्रिशने सुरेख सुरुवात करत अर्णव विरुध्द हा सेट 6-3 असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये पिछाडीवर असलेल्या अर्णव जोरदार कमबॅक करत सातव्या गेममध्ये क्रिशची सर्व्हिस रोखली व हा सेट 6-3 असा जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये अर्णव याने आपला खेळ उंचावत पहिल्याच गेममध्ये क्रिशची सर्व्हिस रोखली. या सेटमध्ये वर्चस्व राखत अर्णव याने क्रिश विरुध्द हा सेट 6-3 असा जिंकून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. दुसऱ्या सामन्यात फ्रान्सच्या मोइस कौमेला पुढे चाल देण्यात आली. जपानच्या हिरोमासा कोयामाची तब्बेत बिघडल्यामुळे त्याने या स्पर्धेतून माघार घेतली.
मुलींच्या गटात अव्वल मानांकित भारताच्या माया राजेश्वरन रेवती हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत अकराव्या मानांकित कझाकस्तानच्या अरीना गोगुलीचा 6-3, 7-6(7-5) असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताच्या लक्ष्मीसिरी दांडू हिने इराणच्या दुसऱ्या मानांकित
मांडेगर फरजामीचा 2-6, 6-4, 6-2 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
दुहेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात क्रिश त्यागी व काहिर वारिक या दुसऱ्या मानांकित जोडीने हितेश चौहान व रेथिन सेंथिल कुमार यांचा 5-7, 6-4, 10-8 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात आयशी बिश्त व लक्ष्मीसिरी दांडू यांनी श्रीनिधी बालाजी व आर बासिरेड्डी यांचा 6-4, 6-4 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील दुहेरीतील विजेत्या जोडीला एम व्ही देव करंडक व 75 आयटीएफ गुण, तर उपविजेत्या जोडीला करंडक व 45 आयटीएफ गुण देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी डेव्हिस कप खेळाडू संदीप किर्तने, डेक्कन जिमखानाच्या टेनिस विभागाचे सचिव अश्विन गिरमे आणि आयटीएफ सुपरवायझर लीना नागेशकर यांच्या हस्ते करण्यात आले.
निकाल: उपांत्य फेरी: मुले: एकेरी:
मोइस कौमे (फ्रांस)[15]पुढे चाल वि.हिरोमासा कोयामा (जपान)[16]
अर्णव पापरकर (भारत)वि.वि. क्रिश त्यागी (भारत) [2] 3-6, 6-3, 6-3
मुली:
लक्ष्मीसिरी दांडू (भारत)वि.वि.मांडेगर फरजामी (इराण)[2]2-6, 6-4, 6-2
माया रेवती(भारत)[1] वि.वि.अरीना गोगुलीना(कझाकस्तान)[11] 6-3, 7-6(7-5);
दुहेरी गट: मुले: उपांत्य फेरी:
हितेश चौहान/रेथिन सेंथिल कुमार (भारत)वि.वि.काझुमा किमुरा/इव्हान इउत्किन [1] 6-1, 7-6(1);
क्रिश त्यागी/काहिर वारिक(भारत)[2] वि.वि.विहान रेड्डी/देबासिस साहू(भारत)[7]6-2, 3-6, 12-10;
अंतिम फेरी: क्रिश त्यागी/काहिर वारिक(भारत)[2] वि.वि.हितेश चौहान/रेथिन सेंथिल कुमार (भारत) 5-7, 6-4, 10-8;
मुली: उपांत्य फेरी:
आयशी बिश्त/लक्ष्मीसिरी दांडू(भारत)वि.वि.तेजस्वी दबस/माया राजेश्वरन रेवती(भारत)[1] 6-3, 6-1;
श्रीनिधी बालाजी/आर बासिरेड्डी(भारत)[5] वि.वि.आन्या चौबे/सौम्या रोंडे (भारत) 4-6, 6-3, 10-6;
अंतिम फेरी: आयशी बिश्त/लक्ष्मीसिरी दांडू(भारत)वि.वि.श्रीनिधी बालाजी/आर बासिरेड्डी(भारत)[5] 6-4, 6-4.
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय