कोंढवा बुद्रूकमध्ये टोळक्याचा राडा, खून करण्याची तरूणाला धमकी

पुणे, दि.१९ मे २०२१: दहशत पसरविण्यासाठी हातात दांडके घेउन तरूणाला खूनाची धमकी देत, वस्ती जाळून टाकण्याचे सांगत टोळक्याने राडा घातल्याची घटना कोंढवा बुद्रूकमधील मिठानगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी जुलकर खान वय ४२, रा. मिठानगर, कोंढवा बुद्रूक यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी रात्री साडेबाराच्या सुमारास जुलकर घराजवळ थांबले होते. त्यावेळी चौघांचे टोळके हातात दांडके घेउन आले होते. परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी टोळक्याने जुलकर आणि त्यांच्या साथीदारांना धमकाविले. तु मेरको पेहचानता क्या, मै इधरका भाई हू, मेरे को डरने का, नही तो मै वस्ती जलाउंगा  असे म्हणत टोळक्याने जुलकर यांना मारहाण केली. लाथाबुक्क्यानी मारहाण करून खूनाची धमकी दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक चेतन गोरे तपास करीत आहेत.