पुणे: वडगाव बुद्रूकमध्ये टोळक्याचा राडा, तरूणावर मारहाण

पुणे, 18 नोव्हेंबर 2022- दुचाकीवरून घरी चाललेल्या तरूणाला अडवून टोळक्याने उलट्या कोयत्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना १६ नोव्हेंबरला रात्री साडेसातच्या सुमारास वडगाव बुद्रूक परिसरात घडली.

सचिन उफाळे (वय ४३ रा. हिंगणे खुर्द )असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी तिघांविरूद्ध सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन हे १६ नोव्हेंबरचला रात्री साडेसातच्या सुमारास वडगाव बुद्रूक परिसरातून दुचाकीवर चालले होते. त्यावेळी तिघाजणांनी त्यांना अडवून, आम्हाला ओळखतो का नाही, लय माज आला आहे का, तुझी आज गेमच वाजवतो असे म्हणत मारहाण केली. हातातील कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण करीत उलट्या कोयत्याने सचिनला मारहाण केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक दीपक कादबाने तपास करीत आहेत.