पुणे, २२/०८/२०२३: मोटारी विक्री दालनात चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली. चोरट्यांनी महाराष्ट्रासह कर्नाटक, गोव्यात २१ गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
सावन दवल माेहिते (वय १९), साेनू नागुलाल माेहिते (वय २२), अभिषेक देवराम माेहिते (वय २०), जितू मंगलसिंग बेलदार (वय २३, चाैघे रा. बाेधवड, जि. जळगाव), बादल हिरालाल जाधव (वय १९, रा. मुक्ताईनगर, जळगाव), पिंटू देवराम चाैहान (वय १९, रा. इंदूर मध्यप्रदेश) अशी अटक चोरट्यांची नावे आहेत.
बिबवेवाडी भागात मध्यरात्री २८ जुलै राेजी देवकी माेटर्स शाेरूम फाेडून चाेरट्यांनी ४ लाख ९६ हजारांची रोकड चाेरली हाेती. कात्रज भागातील दोन मोटार विक्री दालनातून रोकड चोरीचे दोन गुन्हे घडले हाेते. त्याअनुषंगाने गुन्हे शाखेच्या युनिट पाचकडून तपास करण्यात येत होता. पोलिसांच्या पथकाने पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यासाठी वेगवेगळ्या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले होते. चोरटे ज्या वाहनातून पसार झाले होते. ते वाहन जळगावमधील असल्याचे तपासात उघडकस आल्यानंतर पोलिसांचे पथक जळगावला रवाना झाले.
आरोपी उत्तर भारतात फिरायला गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथकाने दिल्ली, मथुरा, हरिव्दार येथे पोहोचले. चोरटे रेल्वेने मुंबईला गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या मुंबईतील वांद्रे भागात सापळा लावून सहाजणांना पकडले.
पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक कृष्णा बाबर, उपनिरीक्षक अविनाश लाहाेटे, चेतन चव्हाण, राजस शेख, पृथ्वीराज पांडुळे, राहुल ढमढेरे, विलास खंदारे, दाउद सय्यद, अमित कांबळे, रमेश साबळे, दया शेगर, प्रताप गायकवाड, प्रमाेद टिळेकर, अश्रुबा माेराळे, अकबर शेख आदींनी ही कामगिरी केली.
More Stories
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन
Pune: धनकवडी, औंध क्षेत्रात जोरदार अतिक्रमण कारवाई
Pune: संशोधक विद्यार्थ्यांची ही अवस्था तर बाकीच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच काय?