पुणे रेल्वे स्टेशन परिसरात गांजा तस्करांना अटक, ६ लाखांचा ३२ किलोवर गांजा जप्त

पुणे, दि. १६/०९/२०२२- गांजा विक्रीच्या तयारीत असलेल्या आंतरराज्य त्रिकूटाला अमली पदार्थ विरोधी पथक दोनने अटक केली. त्यांच्याकडून ६ लाखांवर ३२ किलोचा गांजा, तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पुणे स्टेशन परिसरात करण्यात आली.

 

दायनिधी जनाराम नायक, वय 28, हिमांशू मॅथीव नायक वय 22 , कैलास तिबू नायक वय 50 सर्व रा. जिल्हा. गाजापट्टी ओरिसा अशी अटक केलेल्याची नावे आहेत.

 

अंमली पदार्थ विरोधी पथक दोन बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पुणे स्टेशन परिसरात तिघे जण गांजा विक्रीच्या तयारीत असल्याची माहिती अंमलदार युवराज कांबळे आणि नितीन जगदाळे यांना मिळाली.

 

त्यानुसार पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून लावून ३२ किलो ८०० ग्राम गांजा, तीन मोबाईल जप्त करण्यात आले. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी नारायण शिरगावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर , पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, संतोष देशपांडे , चेतन गायकवाड, प्रसाद बोमादंडी, आप्पा रोकडे ,संदीप शेळके, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, योगेश मांढरे, साहिल शेख, दिनेश बास्टेवाड यांनी केली.