पुणे, दि. २४ : रक्षा लेखा प्रधान नियंत्रक कार्यालयाच्यावतीने माजी सैनिकांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी ८ व ९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेली पेन्शन अदालत व माजी सैनिक मेळावा पुढे ढकलण्यात आला असून आता १५ व १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मिल्खासिंग पार्क, कमाण्ड एम. टी. समोर, घोरपडी, पुणे कॅम्प येथे हा मेळावा होणार आहे.
या सैनिक मेळाव्यास संरक्षण मंत्री, संरक्षण राज्य मंत्री संबोधित करणार असून सैन्य मुख्यालय, नवी दिल्ली, ई.सी.एच.एस., ए.डब्ल्यू.एच.ओ., राज्य सैनिक बोर्ड, जिल्हा सैनिक बोर्ड, रेकॉर्ड ऑफिसेस, सैन्य प्लेसमेंट नोड, पीसीडीए, पेन्शन, प्रयागराज येथील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. सर्व रेकॉर्ड ऑफिसमार्फत मेळाव्यामध्ये स्टॉल लावण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता यांच्या पेन्शन, ईसीएचएस, सीएसडी कॅन्टीन आदी बाबतच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी या पेन्शन अदालत व माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळावा आणि पेन्शन अदालत मध्ये उपस्थित रहावयाचे असल्यास हेडक्वार्टर दक्षिण महाराष्ट्र व गोवा सब एरिया हेल्पलाईन नंबर ८४८४०९४६०१ व कर्नल वेटरन, हेडक्वार्टर दक्षिण महाराष्ट्र व गोवा सब एरिया मोबाईल नंबर ९५४५४५८९१३ वर संपर्क साधावा.
पेन्शन, ईसीएचएस, सीएसडी कॅन्टीन आदी बाबतच्या माजी सैनिकांच्या अडचणी असल्यास २ फेब्रुवारी पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय पुणे येथे उपलब्ध असलेला विहित नमुन्यातील अर्ज तीन प्रतीत भरून कार्यालयात जमा करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.), पुणे यांनी केले आहे.

More Stories
सूर महती महोत्सवात रसिकांनी अनुभविली गायन, वादन आणि नृत्यप्रस्तुतीची अनुभूती
नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता २ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Pune: शहरात ३० नोव्हेंबर रोजी ‘नदी महोत्सव’ साजरा होणार