जी.डी.सी.ए.चे न्यू इंग्लिश स्कूल हडपसर परीक्षा केंद्र रद्द, साधना विद्यालयात परीक्षार्थींची बैठक व्यवस्था

पुणे 20/10/2021: – दिनांक 23, 24 व 25 ऑक्टोबर, 2021 रोजी घेण्यात येणाऱ्या जी.डी.सी. अँड ए. व सी. एच.एम. परीक्षा 2020 चे न्यू इंग्लिश स्कूल, ससाणे नगर, हडपसर, पुणे हे केंद्र रद्द करण्यात आलेले आहे. या केंद्रावरील परीक्षार्थींची बैठक व्यवस्था रयत शिक्षण संस्थेचे साधना विद्यालय (मुलांचे), हडपसर, पुणे या शाळेमध्ये करण्यात आलेली आहे, असे जी.डी.सी. अँण्ड ए. बोर्ड चे सचिव महेंद्र मगर यांनी कळवले आहे.