22व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 40000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत जर्मनीच्या तात्जाना मारिया हिला अग्रमानांकन

पुणे, 23 जानेवारी 2023: डेक्कन जिमखाना क्लब यांच्या वतीने आयोजित नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी)प्रायोजित आयटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 22व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 40000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत जर्मनीच्या जागतिक क्रमवारीत 68 व्या स्थानी असलेल्या व विब्लडन स्पर्धेत उपांत्य फेरीतपर्यंत मजल मारलेल्या तात्जाना मारिया हिला अग्रमानांकन देण्यात आले आहे.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे आजपासून मुख्य ड्रॉच्या फेरीस प्रारंभ होत असून उझबेकिस्तानच्या निगीना अब्दुरैमोवाला दुसरे, स्वित्झर्लंडच्या जोआन झुगरला तिसरे मानांकन देण्यात आले.  भारताच्या अंकिता रैनाला आठवे मानांकन देण्यात आले आहे. दुहेरीत अंकिता रैना व  प्रार्थना ठोंबरे या जोडीला अव्वल मानांकन देण्यात आले. स्पर्धेच्या मुख्य ड्रॉची यादी आज आयटीएफ सुपरवायझर शितल अय्यर यांनी जाहीर केली.

स्पर्धेची मानांकन यादी खालीलप्रमाणे:

1 तात्जाना मारिया (जर्मनी), 2 निगीना अब्दुरैमोवा (उझबेकिस्तान), 3. जोआन झुगर (स्वित्झर्लंड), 4 अनास्तासिया तिखोनोवा (रशिया), 5 एकतेरिना मकारोवा (रशिया), 6 इरिना क्रोमाचेवा (रशिया), 7 व्हॅलेरिया सविनिख (रशिया), 8 अंकिता रैना (भारत)

दुहेरी:
1. अंकिता रैना / प्रार्थना ठोंबरे (भारत), 2. ऋतुजा भोसले (भारत)/ एकतेरिना याशिना, 3. डायना मार्सिन्केविका(लात्विया)/ रोसाली व्हॅन डेर होक(नेदरलँड), 4. निगीना अब्दुरैमोवा(उझबेकिस्तान) / एन शुओ लियांग(तैपेई)