राजेश घोडके
पुणे, २९ मार्च २०२५: सोशल मीडिया आणि त्यावरील ट्रेंड, हे सर्वांनाच आपल्या मोहात पाडतात. त्यातच आता सोशल मीडियावर सध्या ‘घिब्ली स्टाईल’ फोटोंचा ट्रेंड तुफान गाजवतोय. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार झालेल्या या फोटोंनी राजकारणी, सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत सर्वांनाच भुरळ घातली आहे, स्टुडिओ घिब्ली हे जपानमधील प्रसिद्ध ॲनिमेशन स्टुडिओ आहे. त्यांच्या चित्रपटांमधील स्वप्नवत निसर्गदृश्ये, रंगछटा आणि जादुई वातावरणाची झलक ‘घिब्ली स्टाईल’ फोटोंमध्ये पाहायला मिळते.
आजच्या डिजिटल युगात, जिथे प्रत्येक गोष्ट संगणकाच्या मदतीने तयार होते, तिथे स्टुडिओ घिब्ली आपल्या पारंपारिक कलात्मकतेवर ठाम आहे. पण, एआयच्या जगात “घिब्ली स्टाईल” फोटोंचा ट्रेंड त्यांच्या कलेची जादू पुन्हा एकदा जगासमोर आणतो.
२८ मार्च २०२५ रोजी भारतातील सोशल मीडियावर स्टुडिओ घिब्ली-शैलीतील प्रतिमा अचानक प्रचंड प्रमाणात व्हायरल झाल्या. अनेक राजकारणी, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि सामान्य नागरिकांनी आपले प्रोफाइल फोटो आणि पोस्ट घिब्ली-प्रेरित शैलीत बदलले. या ट्रेंडमागे काही प्रमुख कारणे आहेत, ज्यामुळे घिब्ली भारतात चर्चेचा विषय ठरला आहे.
सोशल मीडियावर तुफान लोकप्रियता एआय टूल्सच्या प्रगतीमुळे लोकांना घिब्ली-शैलीतील प्रतिमा सहजपणे तयार करता येऊ लागल्या. फोटोतील रंगछटा, स्वप्नवत निसर्गदृश्ये आणि जादुई वातावरण असलेल्या या प्रतिमा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकवर झपाट्याने व्हायरल झाल्या.

More Stories
सूर महती महोत्सवात रसिकांनी अनुभविली गायन, वादन आणि नृत्यप्रस्तुतीची अनुभूती
नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता २ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Pune: शहरात ३० नोव्हेंबर रोजी ‘नदी महोत्सव’ साजरा होणार