राम स्पोर्टिंगवरील विजयाने घोरपडी तमिळ युनायटेड सी गटात अव्वल

पुणे १२ मे २०२२ – डेक्कन सी संघाने एकमात्र गोलच्या जोरावर एफसी जोसेफ संघाचा पराभव करून पीडीएफएच्या द्वितीय श्रेणी फुटबॉल स्पर्धेत आपल्या मोहिमेस सुरवात केली. हा सामना स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर झाला. त्याचवेळी सी गटातून घोरपडी तमिळ युनायटेडने आघाडी मिळविली.

 

अ गटातील सामन्यात सौरभ पटवर्धनने ४९व्या मिनिटाला नोंदवलेला गोल निर्णायक ठरला. एफसी जोसेफ संघाचा गेल्या दोन सामन्यातील हा पहिला पराभव ठरला.

 

ब गटातील सामन्यात पीसीएच लायन्स आणि जाएंटस एफसी संघांनी बोपोडी इलेव्हन आणि नॅशनल युथ एफ.ए। संघांवर सहज विजय मिळवून ४ गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले.

 

पीसीएचने बोपोडी इलेव्हनचा ४-२ असा पराभव केला. आशिष कदम याने २७व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर ३४व्या मिनिटाला महंमद शरिफ आणि नंतर ऋषिकेश सोनावणे याने ४० आणि ५९व्या मिनिटाला गोल करून संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. अनिकेत साळवीने ६७ आणि स्टिफ काटे याने ६८व्या मिनिटाला गोल करून पराभूत संघाचे पराभाधिक्य कमी करण्याचे काम केले.

 

 

त्यानंतर झालेल्या सामन्यात जाएंटस एफसी संघाने अन्शुल शर्माच्या (२७वे आणि ५१वे मिनिट) दोन गोलच्या जोरावर नॅशनल युथ एफ.ए. संघाचा २-० असा पराभव करून पहिल्या विजयाची नोंद केली. राहुल एफए संघाने आपल्या विजयी मोहिमेस सुरवात करताना एनडीए युथ स्पोर्टस क्लबचा ५-० असा पराभव केला. कुशल वालेचा याने १२व्या आणि २८व्या मिनिटाला दोन गोल केले. त्याला आनंद शेंडे (१५ वे मिनिट), रायथ जयसिंघानी (२०वे मिनिट) आणि रवी यादवने २६व्या मिनिटाला गोल करून त्याला सुरेख साथ केली.

 

सी गटातील सामन्यात घोरपडी तमिळ युनायटेड संघाने राम स्पोर्टिंग क्लबचा संघर्षपूर्ण लढतीत २-१ असा विजय मिळवून अव्वल स्थान पटकावले. प्रभु भंडारी याने ४० आणि ६०व्या मिनिटाला गोल केले. राम स्पोर्टिंगसाठी मयुर वांद्रे याने ४८व्या मिनिटाला गोल केला.

 

निकाल –

 

स.प. महाविद्यालय – द्वितीय श्रेणी गट अ – डेक्कन सी १ (सौरभ पटवर्धन ४९वे मिनिट) वि. वि. एफसी जोसेफ ०

 

गट बी पीसीएच लायन्स ४ (आशिष कदम २७वे मिनिट, महंमद शरिफ ३४वे मिनिटे, ऋषिकेश सोनावणे ४०, ५०वे मिनिट) वि.वि. बोपोडी इलेव्हन २ (अनिकेत साळ वी ६७वे मिनिट, स्टिफन काटे ६८वे मिनिट)

जाएंटस एफसी २ (अन्शुल शर्मा २७, ५१वे मिनिट) वि.वि. नॅशनल युथ एफए ०

राहुल एफए ५ (कुशल वालेचा १२, २८, आनंद शेंडे १५, रियाथ जयसिंघानी २०, रवी यादव २६वे मिनिट) वि.वि. एनडीए युथ स्पोर्टस क्लब ०

 

गट सी – घोरपडी तमिळ युनायटेड २ (प्रभु भंडारी ४०, ६०वे मिनिट) वि.वि. राम स्पोर्टिंग क्लब १ (मयुर वांद्रे ४८वे मिनिट)