काळ भैरवनाथ मंदिरातर्फे ताराचंद हॉस्पिटलला मिनी व्हेंटिलेटरची भेट

पुणे, 04 मे 2021: कसबा पेठेतील काळभैरवनाथ मंदिरातर्फे रास्ता पेठ येथील शेठ ताराचंद रामचंद धर्मांध रुग्णालयाला तीन मिनी व्हेंटिलेटर भेट देण्यात आले आहे.

करोनाच्या संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक आणि वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत, मंदिरातर्फे यंदा उत्सव आणि जत्रा रद्द करण्यात आली आहे. या पैशातून सामाजिक जबाबदारीचे भान राखत,मंदिरातर्फे रुग्णलयास मिनी व्हेंटिलेटर भेट देण्यात आले. याद्वारे रुग्णांच्या उपचारासाठी मदत मिळेल अशी अपेक्षा मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी महापालिकेचे सभागृह नेते गणेश बीडकर, मंदिराचे विश्वस्त समीर लडकत, अशोक लडकत, अभिषेक लडकत, अजिंक्य लडकत, गोपाळ राठी, रूग्णालयाचे डॉ. सदानंद देशपांडे, डॉ कल्याणी भट उपस्थित होते.