वडकी नाला येथे गोडाउनला आग; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात

पुणे, 01 ऑक्टोबर 2022:  रोजी पहाटे ०३•२० वाजता मु.पो.वडकी नाला (पठार) येथे एका गोडाउनमधे आग लागल्याची वर्दि दलाकडे आली असता काळेबोराटे नगर अग्निशमन केंद्र वाहन तसेच कोंढवा बुद्रुक येथील एक वॉटर टँकर व पीएमआरडीए येथून वॉटर टँकर रवाना करण्यात आले.

 

घटनास्थळी पोहोचताच अंदाजे दहा हजार स्वेअर फुट प्लास्टिक मटेरियल मैन्युफैक्चरिंग गोडाउन असल्याचे निदर्शनास आले. सदर ठिकाणी पञ्याचे बांधकाम असून आग मोठ्या प्रमाणात असताना जवानांनी पाण्याचा मारा करत सुमारे तीस मिनिटात आग आटोक्यात आणत कुलिंग सुरू केले. आगीमधे लोखंडी पञा तसेच एक ४०७ टेम्पो व एकूण ८ मशिन व इतर सर्व साहित्य जळाले. सदर ठिकाणी कोणीही जखमी अथवा जिवितहानी नाही.आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट झाल्याने लागली असा प्राथमिक अंदाज आहे.

 

या कामगिरीत काळेबोराटे अग्निशमन केंद्र अधिकारी अनिल गायकवाड, चालक राजू शेख, तांडेल तानाजी गायकवाड व फायरमन दत्ता चौधरी, विलास दडस आणि पीएमआरडीए वाहन चालक सोनी बापू नागरे, फायरमन अक्षय काळे, सुरेश इंगुले, माळी यांनी सहभाग घेतला.