September 11, 2025

रोजगाराची सुवर्णसंधी 13 ऑगस्ट रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

पुणे, ११ आॅगस्ट २०२५ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे येथे 13 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता, “प्लेसमेंट ड्राइव्ह”चे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच जिल्हयातील नोकरीइच्छुक उमेदवारांसाठी क्रांतिकारक लहुजी साळवे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औद्योगिक वसाहत, नांगरगाव, लोणवाळा, ता. मावळ जि. पुणे येथेही प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे.

मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरिता इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट देऊन रिक्त पदांना ऑनलाइन अॅप्लाय करणे आवश्यक आहे. खाजगी क्षेत्रातील विविध रिक्तपदांकरिता प्लेसमेंट ड्राइव्हच्या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखत (Walk-in-Interview) घेण्यात येणार असून याकरिता नोकरीइच्छूक उमेदवारांनी विहीत दिनांकास प्लेसमेंट ड्राइव्हच्या ठिकाणी उपस्थित राहणे तसेच मुलाखतीस येताना आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती, पासपोर्ट साईज फोटो, आवश्यकतेनुसार बायोडाटा अर्जाच्या (Resume) प्रती सोबत आणणे गरजेचे आहे.

अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे, ४८१ रास्ता पेठ, पुणे येथे कार्यालयीन वेळेमध्ये प्रत्यक्ष अथवा ०२० २६१३३६०६ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन सा.बा.मोहिते, प्र.सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांनी केले आहे.