पुणे, दि. ०५/०७/२०२२: शहरातील कोथरुड भागात दहशत माजविणाNया सराईत गुंड शरद मोहोळ याला सहा महिन्यांसाठी तडीपार करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी दिले.
शरद हिरामण मोहोळ (वय ३८, रा. माऊलीनगर, सुतारदरा, कोथरुड) याच्या विरोधात पुणे शहर, पिंपरी आणि ग्रामीण भागात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
टोळीयुद्धातून मारणे टोळीतील पिंटू मारणे याचा मोहोळ आणि साथीदारांनी खून केला होता. संबंधित गुन्ह्यात न्यायालयाने मोहोळला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मोहोळला मागील वर्षी जामीन मंजूर केला होता. कारागृहाबाहेर आल्यानंतर मोहोळ आणि साथीदारांनी दहशत माजविण्याचे गुन्हे केले होते.
त्यानुसार त्याला सहा महिन्यांसाठी तडीपार करण्याचा प्रस्ताव कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे यांनी पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्याकडे पाठविला होता. त्यासाठी पोलीस कर्मचारी भास्कर बुचडे, अजय सावंत, अनिल बारड यांनी काम पाहिले.
More Stories
पुणे: हिंजवडी च्या मंदिरात जन्माष्टमी, गोपाळकाला उत्सव
उद्योजकतेला प्रोत्साहनासाठी ७५ दिवस ७५ शहरात ७५ कार्यक्रमांचे आयोजन
विश्वकर्मा विद्यापीठात स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा