पुणे: डेक्कनमधील सराईत वर्षभरासाठी तडीपार

पुणे, ०७/०७/२०२२: डेक्कन जिमखाना परिसरात दहशत माजविणा या सराईतला एक वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांनी दिले आहेत. राहुल राजेंद्र देवकर (रा. पवार क्वाटर्स, भांडारकर रस्ता, डेक्कन जिमखाना) असे तडीपार केलेल्याचे नाव आहे.

डेक्कन तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्यातंर्गत देवकर याच्यविरोधात मारामारी, लूट, दहशत प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्याला तडीपार करण्याचा प्रस्ताव डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी पाठविला होता.

त्यानुसार त्याला वर्षभरासाठी तडीपार करण्यात आले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, वरिष्ठ निरीक्षक मुरलीधर करपे, पोलीस निरीक्षक शफील पठाण, सहायक निरीक्षक बाबासाहेब झरेकर, उपनिरीक्षक किशोर शिंदे, राकेश गुजर, बोरसे, बोरकर, ननावरे यांनी केली.