पुणे, २९ /१२/२०२१:- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी खडकी येथील दिव्यांग सैनिकांच्या क्विन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटला भेट देवून माहिती जाणून घेतली.
यावेळी लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया, मेजर जनरल इंद्रजीत सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल बाली आदी उपस्थित होते.
राज्यपाल यांनी येथील दिव्यांग सैनिकांशी संवाद साधला. हिंमत हारू नका, खचू नका, मेहनत करा, निराश होऊ नका. आपले मनोबल उच्च असून स्पर्धा परीक्षांची चांगली तयारी करा. आपल्यांपैकी काहींनी खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी बजावली असून समाजापुढे आदर्श आहात. आपल्यातील कौशल्यांना वाव द्या, असे आवाहन करत त्यांनी सैनिकांचे कौतुक केले.
More Stories
अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या सुधारित खर्चास मान्यता
औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नाव बदलण्यास राज्य सरकारची मान्यता
पीएमपीएमएलतर्फे ‘मी पीएमपीएमएलचा प्रवासी’ स्पर्धेचे आयोजन