भोसरी विधानसभा मतदारसंघात मतदारनोंदणीसाठी मार्गदर्शन

पिंपरी २५ नोव्हेंबर २०२२ ः भोसरी विधानसभा मतदार संघातील महाविद्यालयातील राजमाता जिजाऊ कला,वाणिज्य महाविद्यालय लांडेवाडी भोसरी येथे व मॉडर्न हायस्कूल निगडी येथे व अन्य महाविद्यालयात नव मतदारांची मतदार यादीत नोंदणी होणे कामी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

त्या अनुषंगाने महाविद्यालयातील नवं मतदारांची वोटर हेल्पलाइनद्वारे आॅनलाईन व ऑफलाईन स्वरूपात नोंदणी करून घेण्यात आली. तसेच, सदरील शिबिरात विद्यार्थ्यांना 207 भोसरी विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉ. राणी ताटे मॅडम,गीता गायकवाड मॅडम अपर तहसीलदार पिंपरी चिंचवड तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, आण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी क विभाग तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व श्री अशोक पाटील सर प्राचार्य राजमाता जिजाऊ कॉलेज लांडेवाडी भोसरी व मश्री पांडुरंग पवार तहसीलदार करमणूक कर अधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व श्री सुनील कास्टेवाड महसूल सहायक 207 भोसरी विधानसभा मतदारसंघ यांनी मोलाचे असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांची नोंदणी करून घेण्याचे आवाहन या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आले आहे..