September 20, 2025

पुण्यात चालक बांधवांचा हृदयस्पर्शी गौरव समारंभ

पुणे, १८ सप्टेंबर २०२५ : प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक परिवहन कार्यालयात चालक बांधवांचा हृदयस्पर्शी गौरव समारंभ पार पडला. यावेळी चालक बांधवांना व भावी चालकांना फुलांचा गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा शेख यांनी केले. या प्रसंगी एसटी चालक राजू सोसुने यांनी आपली भावना व्यक्त करत सर्वांना भावूक केले. महत्त्वाच्या कार्यालयीन कामकाजात चालक बांधवांची भूमिका अधोरेखित करण्यात आली. “जसा महाभारतात अर्जुनाला विजय मिळवण्यासाठी श्रीकृष्ण सारथी ठरले, तसंच आपल्या कार्यात चालक बांधव खरे सारथी ठरतात,” असे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.

वाहन चालवण्याबरोबरच सुरक्षितता व यशस्वी कामगिरीची जबाबदारी ते पार पाडतात. त्यांच्या अथक परिश्रमांप्रती व सेवेसाठी सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली.