हिंजवडी वाहतूक विभाग अंतर्गत अवजड वाहनांना प्रवेश बंदी

पुणे, ०५/०३/२०२२:- हिंजवडी वाहतूक विभागांतर्गत अति महत्वाचे बंदोबस्त असल्याने अवजड वाहनांना उद्या 6 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पुढील आदेश येईपर्यंत प्रवेश बंदी करण्यात येत आहे.

 

हिंजवडी वाहतूक विभाग अंतर्गत ननावरे अंडरपास ते सूस गाव सनीज वर्ल्ड या रस्त्यावर जाणाऱ्या व येणाऱ्या अवजड वाहनांना (मिक्सर, कंटेनर) प्रवेश बंदी करण्यात येत आहे. हा आदेश अत्यावश्यक सेवेतील फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी वाहनांखेरीज अन्य वाहनांसाठी तात्पुरत्या स्वरुपात आदेश काढण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवड शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिली आहे.