एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस एआयटीए राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत श्रावी देवरे, रित्सा कोंडकर, नमिश हूड यांची विजयी मालिका कायम

पुणे, 4 मे 2022: डेक्कन जिमखाना व महाटेनिस यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस 12 वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत उप-उपांत्यपुर्व फेरीत मुलींच्या गटात श्रावी देवरे, रित्सा कोंडकर यांनी तर, मुलांच्या गटात नमिश हूड या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

 

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मुलींच्या गटात बिगरमानांकीत श्रावी देवरे हिने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत सहाव्या मानांकित काव्या तुपेचा 6-0, 6-3 असा पराभव केला. पाचव्या मानांकित रित्सा कोंडकरने दुसऱ्या मानांकित जान्हवी चौगुलेचा 4-6, 6-4, 6-2 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करत उपांत्य फेरी गाठली. तिसऱ्या मानांकित रितिका दावलकरने मायरा टोपणोचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव केला. चौथ्या मानांकित सृष्टी सूर्यवंशीने शिबानी गुप्तेचे आव्हान 6-3, 6-0 असे संपुष्टात आणले.

 

मुलांच्या गटात अव्वल मानांकित स्मित उंडरेने पाचव्या मानांकित ऋषिकेश मानेचा 6-2, 6-1असा पराभव केला. तिसऱ्या मानांकित आरव पटेल[ने सर्वज्ञ सरोदेचा 4-6, 6-4, 6-3 असा पराभव करून आगेकूच केली. नमिश हूड याने चौथ्या मानांकित वीरेन चौधरीला 6-1, 6-1 असे नमविले. दुसऱ्या मानांकित वरद उंडरेने नीरज जोर्वेकरचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

 

निकाल: मुख्य ड्रॉ(उपांत्यपूर्व) फेरी: मुले:

स्मित उंडरे[1] वि.वि.ऋषिकेश माने[5]6-2, 6-1;

आरव पटेल[3] वि.वि.सर्वज्ञ सरोदे 4-6, 6-4, 6-3;

नमिश हूड वि.वि.वीरेन चौधरी [4] 6-1, 6-1;

वरद उंडरे[2]वि.वि.नीरज जोर्वेकर 6-3, 6-2;

 

मुली:

श्रावी देवरे वि.वि.काव्या तुपे[6] 6-0, 6-3;

रितिका दावलकर [3] वि.वि.मायरा टोपणो 6-0, 6-0;

सृष्टी सूर्यवंशी[4] वि.वि.शिबानी गुप्ते 6-3, 6-0;

रित्सा कोंडकर[5] वि.वि.जान्हवी चौगुले[2] 4-6, 6-4, 6-2;

 

दुहेरी गट : मुले: दुसरी फेरी:

कबीर गुंडेचा/वीर चतुर वि.वि.अझलन शेख/तनिष्क पाटील6-3, 7-6(9-3);

आरव छल्लानी/अदिराज दुधाने वि.वि.पार्थ दाभीकर/आरव बेले 6-2, 6-2;

नील देसाई/कियान पौआ वि.वि.अर्चन पाठक/मिहीर काळे 6-3, 6-4;