पुणे, दि. 07/05/2021: टेक महिंद्रा वंâपनीतील एका टीम लीडरनेच सहकारी तरूणीसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला आहे. तरूणीला स्पर्श करणे, वॉशरूमपर्यंत तिचा पाठलाग करणे, घाणेरड्या कमेंट करीत विनयभंग केला आहे. संजय दास (रा. विमाननगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या टीमलीडरचे नाव आहे. त्याशिवाय शिवी कालिया, माक डिसील्वा, हिमांशु शर्मा, इम्रान खान, निताश कुटी, हर्षवेंद्र सॉईन या मॅनेजमेंटविरूद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी २२ वर्षीय तरूणीने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
फिर्यादी तरूणी येरवड्यातील टेक महिंद्रा वंâपनीमध्ये कामाला आहे. त्याठिकाणी संजय दास हा तरूणीचा टीमलीडर आहे. मार्च २०२० पासून संजय तरूणीसोबत लगट करण्याचा प्रयत्न करीत स्पर्श करणे, वॉशरूमला जाताना तिचा पाठलाग करीत होता. त्याशिवाय तरूणीने घातलेल्या कपड्यांबाबतही संजय घाणेरड्या कमेंट करीत होता. टीम लीडर असल्यामुळे तरूणीने काही दिवस अन्याय सहन केला. त्यानंतर तिने मॅनेजमेंटकडे त्याची तक्रार केली होती. मात्र, संबंधित वंâपनीच्या मॅनेजमेंटनेही कोणतीही कारवाई केली नाही. याप्रकरणी येरवडा पोलीस तपास करीत आहेत.
More Stories
रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड’ च्या अध्यक्षपदी अमोल कागवडे ; पदग्रहण समारंभ संपन्न
मिळकतींची माहिती देताना लपवाछपवी
पुणे: डेक्कनमधील सराईत वर्षभरासाठी तडीपार