पुणे, दि. 26 फेब्रुवारी 2024 – सेंट व्हिन्सेंट हायस्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्यातर्फे आयोजित सेंट व्हिन्सेंट ज्युनियर लीग स्पर्धेत फुटबॉल लीगमध्ये हचिंग्ज, लॉयला स्कूल, दस्तूर बॉईज,फादर एग्नेल या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून आगेकूच केली.
सेंट व्हिन्सेंट हायस्कूलच्या फुटबॉल मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत फादर एग्नेल संघाने विद्या व्हॅली संघाचा 5-0 असा धुव्वा उडवला. विजयी संघाकडून तनिश बुगे(3,8,15 मि.)याने तीन गोल, तर अभय देवर्डे(14 मि.), कतादा शेख(22 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. दुसऱ्या सामन्यात शॉन अंगारे(2,12 मि.)याने नोंदवलेल्या दोन गोलाच्या जोरावर लॉयला स्कूल संघाने कल्याणी स्कूल संघाचा 3-0 असा सहज पराभव केला. लॉयला स्कुल संघाने दस्तूर को-एड संघाचा 2-1 असा संघर्षपूर्ण पराभव केला.
अन्य लढतीत अर्णव जरांडे(1 मि.), कुशल शिंदे(20 मि.)यांनी केलेल्या प्रत्येकी एक गोलाच्या जोरावर दस्तूर बॉईज संघाने आर्यन वर्ल्ड स्कूलचा 2-0 असा पराभव करून आगेकूच केली. एसएसआरव्हीएम संघाने सेंट पॅट्रिक्स संघावर 1-0 असा विजय मिळवला.एसएसआरव्हीएमकडून सार्थक इनामदार(24 मि.) याने एक गोल करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
निकाल: साखळी फेरी:
हचिंग्ज: 5(अयान जे. 2 मि., प्रणत जे. 7 मि., देवांश के. 10 मि., विवान पी. 25 मि.) वि.वि.सेंट पॅट्रिक्स: 0;
लॉयला स्कूल: 3 (शॉन अंगारे 2.12 मि., निवेद नायर 12 मि.)वि.वि.कल्याणी स्कूल: 0;
दस्तूर बॉईज: 2 (अर्णव जरांडे 1 मि., कुशल शिंदे 20 मि.)वि.वि.आर्यन वर्ल्ड स्कूल: 0;
फादर एग्नेल: 5(तनिश बुगे 3,8,15 मि., अभय देवर्डे 14 मि., कतादा शेख 22 मि.)वि.वि.विद्या व्हॅली: 0;
एसएसआरव्हीएम: 1 (सार्थक इनामदार 24 मि.)वि.वि.सेंट पॅट्रिक्स: 0;
लॉयला स्कुल: 2 (शॉन अंगारे 2,12 मि.) वि.वि.दस्तूर को-एड: 1 ( शयान इराणी 16 मि.)

More Stories
गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत कीर्तना रागिनेनी, नाव्या शर्मा, अव्यक्ता रायावरपू, नमित भाटिया, सक्षम भन्साळी यांचे सनसनाटी विजय
एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशीप सिरीज(16वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत रिशीता यादव हिला दुहेरी मुकुटाची संधी
एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशीप सिरीज(16वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत मयंक राजन, रोहन बजाज, रिशीता यादव, स्वरा जावळे यांचा उपांत्य फेरीत प्रवेश