पुणे, ८ मे २०२५: “माझ्या वडिलांनी जो सल्ला मला दिला होता, तो जर मी ऐकला असता तर आज माझं देखील एक व्यंगचित्र इथ दिसलं असतं. त्यांनी मला लहानपणी एकच सल्ला दिला होता की काहीही कर पण दिवसातून एकदा चित्र काढत जा. पण मी तो ऐकला नाही,” अशी खदखद महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी बोलून दाखवली.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आयोजित बोलक्या रेषा व्यंगचित्र प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमाला मनसे नेते अमित ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी व्यंगचित्रांच्या बाबत आपले मत व्यक्त करत राज ठाकरे यांनी दिलेल्या सल्ल्याबाबत उल्लेख केला.
कार्यक्रमादरम्यान अमित ठाकरे म्हणाले की “व्यंगचित्रांची कला ही तुम्हाला कोणी शिकू देत नाही ही कला तुमच्या आत असते किंवा नसते. माझे अनेक मित्र आहे ज्यांनी चित्रकला शिकण्याचा, व्यंगचित्र शिकण्याचा प्रयत्न देखील केला. पण त्यांना एक साधी रेषा देखील काढता येत नाही. आज याठिकाणी लहान मुलांचे व्यंगचित्र पाहून खूपच आनंद झाल आहे. तुमची ही कला कधीच सोडू नका. जो सल्ला माझ्या वडिलांनी मला दिला होता, तोच मी तुम्हाला देईल. आयुष्यात कितीही व्यस्त झाला तर एक तास हे व्यंगचित्राला देत जा.”

More Stories
Pune: बँक कर्मचाऱ्यांचे नववे अधिवेशन २७ व २८ डिसेंबर रोजी
Pune: बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयात परिचारिकांसाठी निशुल्क कार्यशाळा संपन्न
Pune: बाणेर-बालेवाडीत पवारांचा डाव; मुरकुटेंच्या भेटीने राजकीय खळबळ