अवैध सावकारी – माजी सरपंचासह दोघांवर गुन्हा दाखल

पुणे, १८/०९/२०२२: व्यावसायिकाला ५ टक्के व्याजाने १० लाख देऊन व्याजाची रक्कम देण्यास उशीर झाल्यानंतर फ्लॅट व शॉप तारण ठेवून तो सोडविण्यासाठी ३३ लाखांची खंडणी मागणी करणाऱ्या पिसोळी गावच्या माजी सरपंचासह दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. खंडणी विरोधी पथक दोनकडून ही कारवाई केली आहे.

 

नवनाथ ज्ञानोबा मासाळ (रा. पिसोळी), उमेश श्रीहरी मांगडे (रा. मांगडेवाडी) यांच्यावर महाराष्ट्र सावकारी अधिनियमांतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ३४ वर्षीय व्यक्तीने तक्रार देण्यात आली आहे.

 

मांगडेच्या कात्रजमधील हॉटेलवर नेले. याठिकाणी मासाळ यांनी मांगडेंकडून १० लाख रुपये ५ टक्के प्रतिमहीना व्याजदराने घेवून त्यांना दिले. पैसे देतेनाच ५० हजार रुपये व्याज काढून घेतले होते. तर, महागडी मर्सिडीज कार गहाण ठेवली होती. वेळोवेळी तक्रारदारांनी व्याज स्वरूपात ४ लाख १० हजार रुपये परत केले. मात्र, काही महिन्यांचे व्याज देऊ शकले नाही. त्यावेळी व्याजावर व्याज आकारणी केली. तसेच, दोघांनी संगणमतकरून त्यांचा एक प्लॅट व एक शॉप तारण ठेवतले. ते सोडविण्यासाठी ३३ लाखांच्या खंडणीची मागणीकरू लागले. पैसे देत नसल्याने त्यांच्या घरात घुसून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. सततच्या त्रासामुळे त्यांनी खंडणी विरोधी पथक दोनकडे अर्ज दिला होता. अर्जाची चौकशी पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे हे करत होते.