पुणे, १ आॅक्टोबर २०२५: हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी जोरदार तयारी केली असताना आता त्यांच्यापुढे मुस्लिम समाजाने मोठे आव्हान निर्माण केले आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातून मुस्लिम समाजाचे ॲड. अय्युब शेख यांना उमेदवारी देऊन मुस्लिमांना सत्तेत भागीदारी द्यावी अशी मागणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे करण्यात आलेली आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला पूर्णपणे पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपला अनेक ठिकाणी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात मुस्लिमांची संख्या निर्णायक आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाला येथून उमेदवारी दिली पाहिजे अशी मागणी शरद पवार यांच्याकडे करण्यात आलेली आहे.
चाळीस वर्षांपूर्वी फक्त एकच मुस्लिम आमदार पुण्यातून अमिनुद्दिन पेनवाले निवडून गेले होते. त्यानंतर कधीही मुस्लिमांना पुण्यात संधी मिळाली नाही. महाविकास आघाडी कडून यावेळी उमेदवारी द्यावी अशी मागणी आज समस्त पुणे शहर मुस्लिम समाजाच्या वतीने निसर्ग मंगल कार्यालय या ठिकाणी झालेल्या बैठकीत शरद पवार साहेब यांच्याकडे मागणी करण्यात आली.
मुस्लिम धर्मगुरू मौलाना निजामुद्दीन फखरुद्दीन, मौलाना कारी इद्रिस अन्सारी, दी मुस्लिम को-ऑपरेटिव बँकेचे व्हाईस चेअरमन अलीरजा इनामदार, सामाजिक कार्यकर्ता अंजुम इनामदार, मुस्लिम बँक संचालक सईद सय्यद, बबलू सय्यद, सादिक लुकडे, हाजी गुलाम अहमद एज्युकेशन ट्रस्टचे मशकूर शेख, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटना इकबाल अन्सारी, सोहेल खान, रफिक शेख, काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक सेल नदीम मुजावर, मुस्लिम चेंबर ऑफ कॉमर्स गफ्फर सागर, लतीफ शेख, प्रकाश मस्के, नगरसेविका फरजाना शेख, जय हिंद महिला उद्योग अनिसा खान, इब्राहिम यवतमाळ वाला, रिटायर एसीपी जान मोहम्मद पठाण, रिटायर पीएसआय जमील शेख, युवा कार्यकर्ता आरिफ शेख इत्यादी मान्यवर शिष्टमंडळात उपस्थित होते.
पवार साहेब म्हणाले, गेल्या दहा वर्षाचा इतिहासामध्ये केंद्र सरकारला फक्त हिंदू आणि मुसलमानांमध्ये कसा धीवीकरण करता येईल याबाबतचे धोरण जास्त दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत धर्मांध शक्तीला रोखण्यासाठी ४१० चा आकडा पार करण्याची भाषा करणारे देशाची घटना बदलण्याची भाषा करणाऱ्या पक्षाला यावेळी मुस्लिम समाजाने ताकतीने रोखण्याचा काम केले आहे. प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर असे दिसून आले की पहाटे सकाळी लवकर मुस्लिम बांधव आणि महिलांनी मतदानासाठी मोठी लाईन लावली होती. जितका गांभीर्याने मुस्लिम समाजाने लोकसभा निवडणुकीत पुढे येऊन मतदान केले तसेच यंदाही विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांनी पुढे येऊन धर्मनिरपेक्ष पक्षांना मतदान करावे असे आव्हान केले.
मुस्लिम समाज काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत अनेक वर्षापासून आहे. पण यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या सर्व उमेदवारांना व शिवसैनिकांना मुस्लिम समाजाने स्वीकारून एक नवा इतिहास घडविले आहे.
काही दिवसातच अधिकृत घोषणा विधानसभेचे होणार असून लवकरच त्याबाबत आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित बसून योग्य ते निर्णय घेऊ पक्षाची भूमिका असेल की यावेळी जास्तीत जास्त आमदार मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी करणारे विधिमंडळात गेले पाहिजे याबाबत आम्ही प्रयत्नशील राहू असेही पवार साहेब यांनी मुस्लिम शिष्टमंडळाला आश्वासन दिले.
More Stories
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी आधार जोडणी करण्याचे आवाहन
पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपमध्ये भडकले पोस्टर वाॅर, रासने घाटांची एकमेकांना आव्हान
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शहर भाजप मध्ये होणार अंतर्गत मतदान