पुणे, 11 ऑकटोबर 2022: रॉयल कॅनॉट बोट क्लब(आरसीबीसी) यांच्या वतीने आयोजित वार्षिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटात चंद्रमा आर हिने एकेरी, दुहेरी व मिश्र गटात विजेतेपद पटकावत तिहेरी मुकुट पटकावला. तर पुरुष गटात अशोक साखरानी यांनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.
पोचा हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत महिला एकेरीत चंद्रमा आर हिने जया पाटणकरचा 11/5, 11/6, 11/4 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. एकेरी गटाबरोबरच महिला दुहेरीत चंद्रमा आर हिने जया पाटणकरच्या साथीत गीता ब व पल्लवी नहार यांचा 11/5, 15/13, 11/8 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. 15 वर्षांखालील मुलांच्या गटात परम लुणावतने शिव चैनानीचा 11/6 ,11/9, 8/11, 14/11 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.
पुरुष एकेरी (15 ते 49 वर्षांवरील वयोगट) गटात प्रीतम लुनावत याने हशमत लालजीचा 11/8, 11/9, 11/7 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. पुरुष एकेरी (60 वर्षांवरील वयोगट) गटात अंतिम फेरीत अशोक साखरानी याने सुनील शाहचा 11/5, 11/9, 13/11, 11/8 असा पराभव करून विजेतेपद मिळवले. दुहेरीत अशोक साखरानी व पवन एस या जोडीने प्रीतम लुणावत व गौतम लुणावत यांचा 11/9, 11/7, 11/8 असा सहज पराभव करून विजेतेपद पटकावले. मिश्र दुहेरीत अंतिम लढतीत सुनील शाह व चंद्रमा आर यांनी श्लोक नहार व पल्लवी नहार यांचा 11/9, 11/6, 8/11, 9/11, 11/8 असा पराभव करून विजेतेपद पटकविले.
रॉयल कॅनॉट बोट क्लब(आरसीबीसी) यांच्या वतीने क्लबमधील सदस्यांसाठी हि स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण रॉयल कॅनॉट बोट क्लब(आरसीबीसी)चे अध्यक्ष अरुण कुदळे आणि सचिव मछिंद्र देवकर, क्लबचे स्पोर्ट्स चेअरमन समीर सावला यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सदस्य प्रीतम लुनावत, गौतम लुनावत, मल्हार गानला आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
15 वर्षांखालील मुले एकेरी: परम लुणावत वि.वि.शिव चैनानी 11/6 ,11/9, 8/11, 14/11;
पुरुष एकेरी (15 ते 49 वर्षांवरील वयोगट): प्रीतम लुनावत वि.वि.हशमत लालजी 11/8, 11/9, 11/7;
पुरुष एकेरी (60 वर्षांवरील वयोगट): अशोक साखराणी वि.वि.सुनील शाह 11/5, 11/9, 13/11, 11/8;
महिला एकेरी: चंद्रमा आर वि.वि.जया पाटणकर 11/5, 11/6, 11/4;
पुरुष दुहेरी: अशोक साखरानी / पवन एस वि.वि.प्रीतम लुणावत / गौतम लुणावत 11/9, 11/7, 11/8;
महिला दुहेरी: चंद्रमा आर/जया पाटणकर वि.वि.गीता ब/पल्लवी नहार 11/5, 15/13, 11/8;
मिश्र दुहेरी: सुनील शाह/चंद्रमा आर वि.वि.श्लोक नहार / पल्लवी नहार 11/9, 11/6, 8/11, 9/11, 11/8.
More Stories
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद
प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा